Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

साईबाबा संस्थान कॅन्सर, रक्तासंबंधीच्या आजारावरील उपचारास अनुदान देणार

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुधारित वैद्यकीय आर्थिक अनुदान नियमावलीस शासनाच्या विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार साईबाबा संस्थानमार्फत गरीब व गरजू रुग्णांना आता कर्करोगासंबंधी शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार, रक्तासंबंधीचे आजार आणि जीबीए (guillain barre syndrome) यासाठी वैद्यकीय आर्थिक अनुदान शस्त्रक्रिया आणि नंतरच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

रुग्णांचा/पालकाचा व्यवसाय, शेती वा नोकरी या सर्व मार्गाने मिळणार्‍या उत्पन्नाबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल. रूग्ण 60 वर्षांच्या वर असेल तर केवळ त्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा विचार करून अनुदान देण्यात येणार आहे. सरकारी, जिल्हा परिषद वा महानगरपालिका तसेच संस्थानच्या अनुदान यादीत असणार्‍या रूग्णालयांसाठी हे अनुदान दिले जाईल.संस्थानच्या रूग्णालयात ज्या रूग्णांच्या शस्त्रक्रिया वा उपचार होणार अथवा झालेेले असतीलतर अशा रूग्णांना संस्थानामार्फत अनुदान देण्यात येणार नाही.

केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायिनी/महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, तत्सम योजनेंतर्गत लाभ घेणार्‍या रूग्णांना संस्थानमार्फत अनुदान देण्यात येणार नाही.

यांना मिळणार लाभ
पिवळे रेशनकार्ड धारक रूग्ण व त्यांचे कुुटुंबिय यांचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार किंवा त्यापेक्षा कमी व केसरी रेशनकार्डधारक रूग्ण त्यांचे कुटुंबिय यांचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 85 हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्यास अर्जदारांचा अर्ज अनुदानासाठी ग्राह्य समजण्यात येईल.

कॅन्सरसारख्या आजारांसाठी दरवर्षी अनुदान
शस्त्रक्रियेसाठी एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा 50 हजार रूपये पैकी जी कमी पूर्णाकित रक्कम असेल तेवढी रक्कम देण्यात येईल. पण शस्त्रक्रिया, उपचाराचा खर्च 15000 अथवा त्यापेक्षा कमी असल्यास अनुदान देण्यात येणार नाही. प्रत्येक रूग्णास गंभीर आजारासाठी फक्त एकदाच अनुदान देण्यात येते. पण कॅन्सरसारख्या आजारांसाठी दरवर्षी अनुदान देण्यात येईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!