Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

साई मंदिराच्या सुवर्ण कलशावर साईभक्तांनी पाहिले चंद्रग्रहण

Share

शिर्डी (प्रतिनिधी)- सन 1870 मध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानंतर म्हणजेच 149 वर्षांनंतर खंडग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग मंगळवारी मध्यरात्री पुन्हा जुळून आल्याने साईबाबांच्या नगरीत रात्री 1 वाजून 31 मिनिटांनी हे खग्रास चंद्रग्रहण साई मंदिराच्या सुवर्ण कलशावर हजारो भक्तांना तब्बल तीन घंटे स्वच्छ अवकाशात बघायला मिळाल्याने आनंद व्यक्त करीत आमच्या जीवनातील एक अविलक्षनीय पर्वणी असल्याचे भक्तांनी सांगितले. दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजता श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

या मिरवणुकीत साईभक्त, ग्रामस्थ आणि वाजंत्री पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री शेजारती झाल्यानंतर साई मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येत असते मात्र यंदाच्या वर्षी खग्रास चंद्रग्रहण असल्याच्या कारणामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ग्रहण काळात समाधी मंदिरात मंत्रोपचार विधी केला नसून नियमित पणे ग्रहण पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सुटल्यानंतर दि.17 जुलै रोजी काकड आरती करण्यात आली. मंगलस्नान, दर्शन व सकाळी श्रींची पाद्यपूजा तसेच गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. 149 वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला ग्रहण लागले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!