Thursday, May 2, 2024
Homeनगरसाईमंदिर खुले न केल्यास मनसेचे 25 रोजी खळ्ळखट्याक आंदोलन

साईमंदिर खुले न केल्यास मनसेचे 25 रोजी खळ्ळखट्याक आंदोलन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुका व शिर्डी शहराच्यावतीने साईभक्तांसाठी साईबाबांचे मंदिर खुले करण्यासाठी दिलेल्या आंदोलनाच्या इशार्‍याची दखल घेऊन

- Advertisement -

पोलीस व साईबाबा संस्थान प्रशासनाने मनसे पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. मनसेच्या पदाधिकार्‍यांना कार्यकारी अधिकारी के एच.बगााटे यांनी आम्ही फक्त प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहत असून यातून लवकरच मार्ग निघेल असे आश्वासन दिल्यानंतर मनसेच्यावतीने तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी साईमंदिर लवकरात लवकर खुले न केल्यास 25 सप्टेंबर रोजी मनसे खळ्ळ खट्याक आंदोलन छेडेल, असा इशारा पत्रकात दिला.

मनसे तालुका अध्यक्ष राजेश लुटे, मनविसे जिल्हाध्यक्ष विजय मोगले, तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव, शिर्डी शहर संघटक लक्ष्मण कोतकर, प्रशांत वाकचौरे, व सौरभ हाडोळे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी शहर संघटक लक्ष्मण कोतकर तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव या सर्वांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असून तोपर्यंत आंदोलन साईबाबा संस्थांनच्या अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी सांगितलेल्या श्रद्धा व सबुरी तसेच प्रशासकीय कार्यकारी अधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन यापुढे मंदिर जर साईबाबा संस्थांननी व प्रशासनाने जर उघडले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 25 सप्टेंबर रोजी कुठल्याहीक्षणी आंदोलन छेडेल असा खळ्ळ खट्याक इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या