शिर्डीत विविध ठिकाणी 30 दर्शन पास काऊंटर

0

कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांची माहिती

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- वातानुकुलीत दर्शनरांगेसाठी जुन्या प्रसादालयाची इमारत पाडण्यात आल्यामुळे तेथे सुरू असलेले मोफत दर्शनपास काऊंटर तुर्तास बंद करण्यात आले असुन त्याऐवजी ते इतर 30 ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी पत्रकार परीषदेत दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या की, जुन्या प्रसादालयाची इमारत पाडण्यात आली असुन त्याजागी नवीन वातानुकुलीत दर्शनरांगेसाठी इमारतीचे काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे तेथे असलेले मोफत दर्शनरांगेचे काउंटर बंद करण्यात आले आहे. तसेच यापुर्वी 16 काऊंटर सुरू होते त्यात साईसमाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभुमीवर बदल करण्यात आला असुन आता 16 ऐवजी 30 काऊंटर केले असल्याचे सांगितले.

नव्याने स्थापीत केलेले मोफत दर्शनपासचे काऊंटर साईआश्रम भक्तनिवास 1, श्री साईबाबा भक्तनिवास 1, द्वारावती भक्तनिवास 2, साईधर्मशाळा 1, साईनगर मैदान 6, शिर्डी बसस्थानक 1, साईउद्यान इमारत 2, श्रीराम पार्कीग 10, साईपालखी निवारा निमगांव 1 याबरोबरच शुल्क आकारण्यात येणारे दर्शनपास काऊंटर साईउद्यान इमारत 3 तर श्रीराम पार्कींग येथे 2 असे एकुण 30 दर्शन पास काऊंटर काल गुरूवारपासून सुरू करण्यात आले आहेत.

मोफत 25 व 5 सशुल्क दर्शन पास काऊंटर सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, धनंजय निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*