Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

साईबाबा सशुल्क दर्शन पासेस सकाळपासून बंद

Share

दोन तासात सशुल्क पासेसच्या विक्रीतून दहा लाख रुपये जमा

शिर्डी ( शहर प्रतिनिधी )- गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाल्याने साईबाबा संस्थानच्या वतीने सशुल्क दर्शनाचे व्हि.आय.पी.पासेस सेवा आज सकाळपासून बंद करण्यात आली असल्याचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी सांगितले आहे.

दरम्यान ज्या भाविकांनी सशुल्क पासेस घेतले होते. त्यांनाही दोन दोन तास दर्शनासाठी प्रतिक्षा करण्यात आल्याने अनेकांनी साईबाबा संस्थान प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

जनसंपर्क कार्यालयाच्या भाविकांनी आरडाओरडा केली. दरम्यान सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत अवघ्या दोन तासात सशुल्क पासेसच्या विक्रीतून दहा लाख रुपये जमा झाले आहे. हि सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद असल्याचे सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!