साईसंस्थान सुरक्षारक्षकांची जबाबदारी आता रक्षकग्रुपकडे

0
शिर्डी (प्रतिनिधी) – विविध देवस्थानच्या सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी चांगल्या रितीने संभाळून नावलौकिक मिळविलेल्या रक्षक ग्रुपकडे आता साईबाबा संस्थानला सुरक्षा कर्मचारी पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुमारे 1106 कर्मचार्‍यांचा सुरक्षा कर्मचार्‍यांचा ठेका रक्षकग्रुपचे कार्यकारी संचालक रणजीतसिंह पाटील यांना देण्यात आला.
रक्षकग्रुपच्या कार्यारंभ प्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, कामगार अधिकारी अशोक वाळुंज, संस्थानचे सुरक्षा ग्रुपचे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील आदी उपस्थित होते.
साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त मोठ्या संख्येने भाविक साईदर्शनासाठी येणार आहे. भक्तांची सुरक्षा व्यवस्था अधिक महत्त्वाची असून सुरक्षा रक्षक ग्रुपच्या संरक्षण विभागाच्या कर्मचार्‍यांनी भक्तांनी चांगली सेवा देऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, अशी अपेक्षा यावेळी विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे यांनी व्यक्त केली.
साईबाबा संस्थानमध्ये यापूर्वी त्यांनी सन 2010 ते 2015 दरम्यान सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम केले आहे.
सुरक्षा व्यवस्थेमध्ये या ग्रुपने एक तप पूर्ण केले आहे. संस्थानमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले तत्कालीन कर्मचारी सोहम ताम्हणे, पोपट वारे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी तातडीची 11 हजार रुपयाची तातडीची मदत दिली. तसेच दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा अपघाती विमा मिळवून दिला होता. एका कर्मचार्‍याच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतली तर दुसर्‍या कर्मचार्‍याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.
लक्ष्मण मोकळे या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांना तातडीची 1 लाखाची मदत व दोन लाख रुपयाचा विमा मिळवून दिला. नांदुर्खी येथे विधाते कुटुंबीयास संसार उपयोगी साहित्य घेऊन दिले होते. कर्मचार्‍यांच्या मदतीला धावून जाणार्‍या या रक्षकग्रुपला पुन्हा ठेका मिळाल्याने संस्थान सुरक्षा रक्षकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  पुणे येथील उद्योजक रणजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षक ग्रुप ऑफ  कंपनीने विस्तार वाढविला आहे. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेमध्ये आतापर्यंत दिलेल्या प्रामाणिक व चोख सेवेमुळे या ग्रुपला साईबाबा देवस्थान व परिसरासाठी 1106 कर्मचारी पुरविण्याची जबाबदारी मिळाली आहे. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, आगम मंदिर, काळाराम मंदिर, नाशिक, त्र्यंबकेश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर, ज्योतिबा मंदिर आदी ठिकाणी रक्षकग्रुपने सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम केले आहे. 

LEAVE A REPLY

*