Friday, April 26, 2024
Homeनगरसाईंच्या दानपेटीत 17 कोटी 42 लाखांची देणगी

साईंच्या दानपेटीत 17 कोटी 42 लाखांची देणगी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत नाताळनिमित्त भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला होता. दि. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या 11 दिवसांच्या काळात साईंच्या झोळीत 17 कोटी 42 लाख दान मिळाल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दिवसेंदिवस साईबाबांवरील भाविकांची श्रद्धा वाढत असून नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांनी गर्दीचा उच्चांक गाठला होता. मागील 11 दिवसांत सव्वा आठ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतल्याचे मुगळीकर यांनी सांगितले. यादरम्यान साईबाबांच्या झोळीत दानाचा विक्रम करीत यंदा नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने 11 दिवसांत 17 कोटी 42 लाखांचे दान टाकले आहे तर गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत 3 कोटी 37 लाख रुपये वाढले आहेत. या वाढत्या दानामुळे साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी उपलब्धी मानली जाते. साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक शिर्डीत दर्शनासाठी आले होते. मागील वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात दक्षिणा पेटीत दान करणार्‍या भाविकांनी सुमारे 14 कोटी 5 लाख रुपयांचे दान केल होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरुपात देणगी काउंटरवरुन सुमारे 3 कोटी 46 लाख रुपयांचे अधिक दान केले आहे. तसेच चेक, डीडी, मनिआँर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, बँकीगचा वापर करणार्‍या साईभक्तांनी 2 कोटी 93 लाख रुपयांचे दान केल आहे. यावर्षी दक्षिणापेटीद्वारे 9 कोटी 54 लाख 99 हजार 670 रूपये प्राप्त झाले.

- Advertisement -

याच दरम्यान 42 लाख 31 हजार सोन्याच्या रुपाने 1 किलो 213 ग्रॅम वजनाचे दान आले असून 5 लाख 80 हजारांची 17 किलो 223 ग्रॅम वजनाची चांदी आलेली आहे. तसेच जवळपास 24 लाख 36 हजार रुपयांचे परकीय देशाचे चलन आलेले आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात 8 लाख 11 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे. 7 लाख 68 भाविकांना मोफत बुंदीचे पाकिटे देण्यात आली आहे. 5 लाख 96 हजार लाडू पाकिटाच्या विक्रीतून 1 कोटी 77 लाख 19 हजार 850 रुपये प्राप्त झाले आहे.

साईआश्रम द्वारावती, साईधर्मशाळा, साईबाबा भक्तनिवास (500 रूम) साईप्रसाद निवांत भक्तनिवास आदी निवासाद्वारे 1 लाख 71 हजार 855 भाविकांची व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पासेसमधून 4 कोटी 8 लाख 69 हजार 400, बायोमॅट्रिक दर्शन पासेसमधून 8 लाख 23 हजार 996 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सांगितले. यावेळी अकौऊंट विभागाचे श्री. खराडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या