साई भक्तांसाठी शिर्डीतून विमानसेवा सुरू

0

राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, शिर्डीच्या कणाकणात साईबाबा : कोविंद यांचे उद्गार

हैद्राबादलाही विमानाचे उड्डाण,  शिर्डी-मुंबई प्रवास केवळ 40 मिनिटांचा,  25-30 हजार लोकांना मिळणार रोजगार : मुख्यमंत्री 

शिर्डी (प्रतिनिधी)- जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले साईबाबांचे शिर्डी अखेर हवाई मार्गाने जोडले गेले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपति राजू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यानंतर शिर्डीहून मुंबईच्या दिशेनं पहिले विमान रवाना झाले. त्यामुळे आता मुंबई ते शिर्डी हा प्रवास आता 40 मिनिटांच्या अंतरावर येऊन पोहोचला. दुपारी 4.20 वाजता शिर्डीहून 72 आसनी विमान 60 प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले. दरम्यान शिर्डी येथील साईबाबा मंदिर सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे. शिर्डीच्या कणाकणात साईबाबा असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
शिर्डी विमानतळ राज्यशासनाने विकसीत केलेले आणि चालविण्यास घेतलेले देशातील पहिले विमानतळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विस्तारीत करनानंतर या विमानतळाच्या माध्यमातून 25 ते 30 हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा दावा केला.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या विमानतळामुळे शिर्डी हे शहर देशातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी सहकारी उद्योगांना याचा मोठा लाभ होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*