Thursday, May 2, 2024
Homeनगरसाईबाबा रुग्णालयातील ब्रदरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण

साईबाबा रुग्णालयातील ब्रदरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा म्हणून अंगिकारलेल्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णाच्या

- Advertisement -

नातेवाईकांनी ऑनड्युटी असलेल्या एका ब्रदरला मारहाण केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र याबाबत शिर्डी पोलिसांत तक्रार देण्यासाठी त्या ब्रदरच्या पाठीशी साईसंस्थान उभे राहिले नाही याची खंत अनेकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे रुग्णालयातील परिचारिका तसेच परिचारक धास्तावले आहेत.

राज्यासह देशभरात नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीसाईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील मेल सर्जिकल वॉर्डमध्ये शुक्रवार दि. 15 रोजी विलास राजाबापू जोंधळे, रा. निमगावजाळी हे आपली ड्युटी करत असताना वॉर्डमधील वैजापूर, जि. औरंगाबाद येथील रुग्ण श्री. जगताप यांनी जोंधळे यांना बोलावले आणि उशिरा आल्यामुळे मागचापुढचा विचार न करता जोरदार त्यांच्या कानशिलात मारली.

सदरील रुग्ण उपचारासाठी दि.11 जानेवारी रोजी भरती झाला आहे. स्वतःच्या हाताने अन्न व पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे त्या रुग्णाला उलटी झाली होती, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

संस्थानच्या कोणत्याही विभागात कर्तव्य बजावत असताना काही वादविवाद, अतिप्रसंग व हाणामारीचे प्रकार घडल्यास कामगारांच्या बाजूने संस्थानने शहानिशा करून कामगारांऐवजी जबाबदार वरिष्ठ अधिकार्‍यामार्फत फिर्याद दाखल करून कामगारांना न्याय द्यावा.

– विठ्ठल पवार, संचालक श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसा शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या