‘सहारा लाईफ इन्शुरन्स’चे हस्तांतरण टळले; ‘सॅट’ने फेटाळला ‘आयआरडीए’चा आदेश

0
नाशिक । सहारा लाईफ इंशुरन्सच्या व्यवसाय हस्तांतरणाचाआदेश सॅटकडून नुकताच फेटाळण्यात आल्यामूळे सहारा लाईफ इंशुरन्सचे हस्तांतरण टळले आहे.

आयआरडीएने सहारा लाईफ इंशुरन्स कंपनीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर प्रशासकाने आयआरडीएला सादर केलेल्या अहवालानंतर आयआरडीएने व्यवसाय हस्तांतरणाचा आदेश देत थर्ड पार्टी विमा कंपनी असणार्‍या आयसीआसी प्रुडेंशियल लाईफ इंशुरन्स कंपनीकडे हस्तांतरणाचे आदेश दिले होते.

आयआरडीएच्या आदेशानंतर सहाराने या निर्णयाच्या विरोधात अपील केले होते. तेव्हा सिक्युरिटी अ‍ॅपलेट ट्रिब्यूनल (सॅट) ने हा आदेश फेटाळून लावला. यावेळी विमा प्राधिकरणाच्या निर्णयाची चिंतादेखील सॅटकडून व्यक्त केली आहे.

विमा प्राधिकरणाने उचललेल्या कठोर निर्णयास अतिशय घातक आणि अयोग्य मानत प्रशासकाने घेतलेले निर्णय हे सत्य परिस्थिती आणि त्यातील तथ्य न तपासता विमा क्षेत्राला हानी पोहोचवणारे असल्याचे सांगत प्रशासकाने आदेश देण्याअगोदर सहाराला याबाबत माहिती द्यायला हवी होती असे मत सॅटने मांडले आहे. दरम्यान, सहारा लाईने प्रशासकाने दिलेल्या आदेशाला उत्तर देण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मागितला आहे.

LEAVE A REPLY

*