सुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा

0

देशदूत डिजिटल विशेष

आज सुरक्षित इंटरनेट दिवस. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. सन 2018 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला. यंदाचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय सुरक्षित इंटरनेट दिवस आहे.

इंटरनेट वापरणाऱ्या सर्वांना या दिशी सुरक्षित इंटरनेट वापरासाठी प्रोत्साहित करणे हाच मुख्य हेतू हा दिवस साजरा करण्यामागे असला तरी कितीजण इंटरनेटचा सुरक्षित वापर करतात. किती जण सावध राहून वेबसाईट बघतात. हे बघणेही महत्वाचे आहे.

आजच्या दिवशी गुगलनेही युजर्सला सिक्युरिटीचेककिया या हॅशटॅग खाली सुरक्षिततेच्या काही टिप्स दिल्या आहेत.याताठी इंटरनेट सुरक्षितपणे कसे वापरावे, वेगवेगळ्या अप्सची पडताळणी कशी करावी याबाबतही ज्ञान अवगत असावं असे सांगण्यात आले आहे.

अपडेट राहण्यासाठी मोबाईल गरजेचा मात्र जागरूकता हवी

सध्या मोबाईलचा प्रभावीपणे वापर सर्वत्र केला जात आहे. इंटरनेटचे पॅक स्वस्त झाल्यापासून इंटरनेटचा वापर वाढला आहे. मोबाईलमध्ये इंटरनेट बँकिंग सर्वच वापरतात त्यामुळे सर्वकाही मोबाईल उघडल्यावर वापरणे सोयीस्कर होते. यामुळे पासवर्ड टाकून खबरदारी घ्यावी. अनेकजण मोबाईलवर बोलत जातात. सार्वजनिक ठिकाणी गर्दीत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मोबाईलतर जातोच पण त्यातील आपली सर्व माहिती जाते. म्हणून काळजी घ्यायला हवी.

मुलांना आता शाळेतून मोबाईलचा प्रभावी वापर करावा असे अनेक ठिकाणी सांगितले जाते. संपर्काचे प्रभावी माध्यमांमुळे वेळेची बचत होते आणि संदेश पटकन समजतो. यामुळे पालकही मुलांना लहान वयात मोबाईल वापरण्याची मुभा देतात. अपडेट वापरण्यासाठी मोबाईल द्यावा पण मोबाईलचे फायदे तोटे मुलांच्या लक्षात वेळोवेळी आणून द्यावेत.

भाग्यश्री केंगे, संचालक marathiworld.com

सावध राहा, सुरक्षित राहा

इंटरनेट वापरताना स्वत:च स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. फेक खाती उघडू नका..आपली ओळख लपवून ठेवू नका यातून खाते हक झाले तर आपल्यावर कारण नसताना संकट ओढवले जाऊ शकते. शक्यतोवर सोशल मीडियात स्वत:चे फोटो ठेऊ नका. जर तुमचे फोटो व्हिडीओ समाजमाध्यमांत तुम्ही अपलोड केलेले नसतील आणि एखाद्या साईटवर ते दिसत असतील तर त्वरित सावध व्हा…आणि संबंधित फोटो रीमुव्ह करायला सांगा. सोशल मीडियातील पासवर्ड मजबूत ठेवा. कुणाला सांगू नका…अनवधानाने सांगितला असेल तर तो ठराविक काळात बदलत राहा. मोबाईल ठराविक वेळेतच वापरा. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या. यामुळे नाती टिकून राहतील. आपली मुलं ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन चलेन्जेस पोर्नोग्राफीच्या आहारी जात नाहीत ना हे तपासावे. सावधान होऊन अशा साईटस बंद कराव्यात.

तन्मय दीक्षित, सायबर सिक्युरिटी तज्ञ

LEAVE A REPLY

*