सई ताम्हणकर ‘एव्हर फ्रेश फेस ऑफ मराठी सिनेमा’

0

मुंबई:–  गोदरेज नं.१ ने सई ताम्हणकरचा ‘एव्हर फ्रेश फेस ऑफ मराठी सिनेमा’ असा गौरव केला आहे.

 सई ही आजच्या आधुनिक स्त्रीचे प्रतिबिंबच आहे, दक्ष, स्वतंत्र आणि सतत नवी उंची गाठण्यावर लक्ष्य केंद्रित केलेली अशी ही आजची स्त्री आहे.

’’नैसर्गिक सौंदर्याचा आयकॉन म्हणून मला मान्यता देणाऱ्या आणि या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी माझे नाव सादर करणाऱ्या मराठी फिल्म फेस्टिवल आणि गोदरेज नं.१ चे मी आभार मानू इच्छिते.’’

याशिवाय सई ताम्हणकर, गजेंद्र अहिरे, सचिन पिळगावकर (कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी), स्वप्नील जोशी, नागेश भोसले, सोनाली कुलकर्णी, परेश मोकाशी, राजेश शृंगारपुरे, अंकुश चौधरी, सचिन खेडेकर, भाऊ कदम, कुशल बद्रिके, तनिष्ठा चॅटर्जी, अनंत महादेवन्, सुबोध भावे आणि अनेक प्रमुख कलाकार उपस्थित होते.

गोवा मराठी फिल्म फेस्टिवलचे हे १०वे वर्ष आहे, येथे दाखवल्या जाणाऱ्या फिल्म, सेलिब्रिटींची उपस्थिती, लाइव्ह परफॉर्मन्सेस आणि तीन दिवसीय अमर्यादित उत्साह यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करून ठेवली आहे.

याशिवाय कुलकर्णी चौकातला देशपांडे, संचार, टेक केअर गुडनाईट, कंडिशन्स अप्लाय (अटी लागू), भावा, सायकल, दशक्रिया, डॉ. रखमाबाई, एफयू, कासव, नदी वाहते, व्हेंटिलेटर, चि व चि सौ का, ओली की सुकी, मुरांबा, हाफ तिकिट, आबा ऐकताय ना (लघुपट), बबल हेड (लघुपट), चौकट (लघुपट) आणि सावट (लघुपट) असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमे दाखवले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*