Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

महिलेसोबत संबंध असल्याच्या अफवा ; साधूने गुप्तांगच कापले

Share

बांदा : उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बांदा जिल्ह्यातील एका साधूबाबाचे महिलेसोबत संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या अफवांमुळे बेजार झालेल्या साधूबाबाने स्वत:चे लिंग छाटले आहे. गावकऱ्यांची याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत साधूबाबाला रुग्णालयात दाखल केले आहे.

मैदानी बाबा(४५) असं या साधूच नाव असून तौर गावाबाहेरच्या एका रिकाम्या सरकारी मालकीच्या पटांगणात तो झोपडी करून राहत होता. हा साधू कडक वैराग्याचे पालन करत होता. काही गावकऱ्यांनी या साधूवर गावातील महिलांशी शारिरिक संबंध ठेवण्याचा आरोप केला. तसंच हे आरोप त्याच्यावर वारंवार करून त्याचा मानसिक छळही केला. गावात त्याची बद्नामी ही केली. यामुळे अत्यंत दु:खी झालेल्या या साधूने चाकूने स्वत:चे गुप्तांग छाटलेय. यानंतर काही वेळातच लोकांनी साधूला जखमी अवस्थेत पाहिले. तेव्हा लगेच साधूला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून त्यााल जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

सध्या या रुग्णालयात या साधूवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. साधूबाबाचे लिंग जवळपास 80 टक्के शरिरापासून वेगळे झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांनी प्रकृति गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलीस त्याचा मानसिक छळ करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!