Type to search

Featured राजकीय सार्वमत

साधना कदम युतीच्या सभापती

Share

सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार

कर्जत (वार्ताहर) – कर्जत पंचायत समितीच्या सभापती साधना कदम यांनी आपण युतीच्या सभापती असल्याचे काल जाहीर करून कोणत्या पक्षाच्या सभापती या विषयावरील चर्चेला पूर्ण विराम दिला; तसेच सोमवारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पत्रकार परिषदेत साधना कदम बोलत होत्या. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, भाजपा महिला अघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ कांचन खेत्रे, तालुका अध्यक्षा मनिषा वडे, शहरअध्यक्ष रामदास हजारे, सोशल मीडियाचे प्रमुख विक्रांत ढोकरीकर, विक्रमसिंह राजेभोसले, रामकिसन साळवे हे मान्यवर उपस्थित होते.

सभापती साधना कदम म्हणाल्या की, सभापती निवडीच्या वेळी युतीचे 3 व राष्ट्रवादी कॉग्रेसचे 3 व अपक्ष एक अशी सदस्य संख्या असताना आमच्या गटाचे प्रमुख कार्यकर्ते यांनी चौंडी येथे जाऊन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना भेटले व आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आम्ही पालकमंत्री यांनी सभापती पदासाठी युतीच्या वतीने माझे नाव जाहीर केले होते.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी निवडीच्या वेळी शिवसेनेचे उपसभापती प्रंशात बुद्धिवंत व भाजपचे बाबासाहेब गांगर्डे यांनी अनुमोदन व सूचक अशा सह्या केलेल्या आहेत. यावेळी माझा एकमेव अर्ज असल्याने मी युतीच्या पाठिंब्यानेच सभापती झाले आहे. यामुळे मी भाजप व सेना युतीची सभापती असून सोमवारी 27 मे रोजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारणार आहे.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक खेडकर म्हणाले की, साधना कदम यांनी भाजप मध्ये प्रवेश केलेला असून त्या युतीच्या सभापती आहेत आणि त्यंानी तसा पत्रकारांसमोर खुलासा केला असून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारणार आहेत. यामुळे आता साधना कदम या युतीच्या सभापती आहेत या बाबत कसल्याच शंका राहिलेल्या नाहीत.

जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ म्हणाले की, साधना कदम या राजकारणात नवख्या आहेत त्यामुळे निवड झाल्यावर त्या गडबडून गेल्या होत्या. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे त्या भाजपच्या सभापती आहेत आणि युतीच्या सर्व सदस्यांसोबतच त्या काम करणार आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!