Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधशिस्त सक्तीने लादता येत नाही

शिस्त सक्तीने लादता येत नाही

सक्तीने शिकवण लादता येत नाही. काही काळ सक्तीने थोड्याफार गोष्टी तुम्ही लोकांना करायला भाग पाडू शकता पण ही सक्ती जर दीर्घकाळ असेल तर तुमचं आणि त्याचं, दोघांच्याही जीवनावर त्याचा परिणाम होतो. सक्तीने ते लादायचा प्रयत्न कराल तर तुमचं आयुष्य बेसूर होतं आणि त्या सक्तीपासून दूर जाण्यात त्यांचंजीवन बेताल होतं.

शिस्त आणि शिकणे हे दोन्ही शब्द एकसमान आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की मी शिस्तप्रिय आहे याचा अर्थ तुम्ही नेहमी शिकण्यासाठी राजी आहात. तुम्ही कुठल्याही साच्यात बंदिस्त झालेले नाही. एखादी गोष्टी विशिष्ट प्रकारे करणे म्हणजे शिस्त नव्हे. प्रत्येक गोष्ट उत्तमरीत्या करायला शिकण्यासाठी राजी आणि त्या दिशेने जर सतत प्रयत्नशील आहात म्हणजे तुम्ही शिस्त आहात. म्हणून लहान मुलांच्या जीवनात जर योगसाधना बाणली तर ते आपोआप शिस्तप्रिय होतील कारण योग साधनेत काही विशिष्ठ गोष्टी अत्यंत दक्षतेने कराव्या लागतात

- Advertisement -

त्याशिवाय योगाचे परिणाम दिसून येत नाहीत. ज्या दक्षतेने योगाचे प्रशिक्षण दिले जाते, आणि एकदा का योग साधना त्याच दक्षतेने केली की तुम्ही बेशिस्त असणं अशक्य आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या