Friday, May 3, 2024
Homeनाशिकघोटी सरपंच निवडणूक : १२ मतांनी 'या' उमेदवाराचा विजय

घोटी सरपंच निवडणूक : १२ मतांनी ‘या’ उमेदवाराचा विजय

घोटी | Ghoti

इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घोटी ग्रामपालिकेच्या सरपंच पदासाठी अत्यंत अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली.

- Advertisement -

सरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरपंचपदी सचिन गोणके यांची निवड झाली. विरोधकांची मते फुटल्याने आश्चर्याचा धक्का बसला. सचिन गोणके यांना १६ पैकी १२ मते मिळाली.

थेट निवडणूक द्वारे सरपंचपदी निवडून आलेले प्रा मनोहर घोडे यांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवड प्रक्रियेचे अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी शाम बोरसे हे होते. आज सकाळी ११ वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली सरपंच पद हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सरपंच पदासाठी सचिन दत्तात्रय गोणके,व सौ अर्चना घाणे यांचे अर्ज दाखल झाले त्यामुळे मतदान घेण्यात आले.

मतदान प्रक्रियेत गोणके यांना १२ मते तर सौ घाणे यांना अवघी चार मते मिळाली. एक सदस्य गैरहजर होते. सरपंच म्हणून सचिन गोणके यांची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी सभागृहात उपसरपंच संजय आरोटे, सदस्य रामदास भोर, गणेश गोडे रविंद्र तारडे, संजय जाधव, श्रीकांत काळे, स्वाती कडू अरुणा जाधव, रुपाली रुपवते, कोंड्याबाई बोटे, वैशाली गोसावी, मंजुळा नागरे सुनंदा घोटकर,सुनीता घोटकर आदी सहभागी झाले होते.

ग्रामविकास अधिकारी धिंदले व पंचायत समितीचे अधिकारी संदीप दराडे यांनी सहायक म्हणून कांम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या