एस.के. दिवेकर जळगाव जिपचे नवे सीईओ; दिवेगावकरांची बदली

0
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एमआयडीसी मुंबईचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस. के. दिवेकर लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत.

दिवेगावकर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण आव्हाने त्यांच्यासमोर असणार आहेत.

कौस्तुभ दिवेगावकर यांची २८ एप्रिल २०१७ रोजी गडचिरोलीहून जळगावला बदली झाली होती. दिवेगावकर यांच्या काळात फाईल ट्रकिंग सिस्टीम सुरु केली त्यामुळे कामांना गती आली.

ऑनलाईन हजेरी सुरुवात केल्यामुळे दांड्या मारणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना दणका दिला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चां हागणदारी मुक्त गावांकडे वळवला. तसेच घरकुल योजनेलाही दिवेगावकर यांच्या काळात गतिमानता आली.

दिवेगावकर यांनी केंद्रांच्या योजनांना जास्त प्राधान्य दिले. त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासन आणि सदस्य यांच्यात समन्वय साधण्यात येत नसल्याने दिवेगावकरांवर सदस्य नाराज होते.

दरम्यान, दिवेगावकरांच्या जागी आता दिवेकर आले आहेत त्यामुळे दिवेकर यांच्या समोर २०१७ वर्षापासून पडून असलेला निधी खर्च करण्याचे मोठे आवाहन आहे.

यासोबतच जळगाव जिल्ह्यात अनेक कामे निधीअभावी पडून आहेत त्यामुळे त्या कामांना गती देऊन त्यांना सदस्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. दिवेकर आल्यानंतर आता काम कशाप्रकारे पुढे नेतील हे तर त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

*