2018च्या हिवाळी ऑलिंपिक्सध्ये रशियन खेळाडूंवर बंदी; ‘आयओसी’चा निर्णय

0

पुढच्या वर्षी दक्षिण कोरियातील प्योंगचोंग येथे होत असलेल्या 2018 च्या हिवाळी ऑलिंपिक्समध्ये डोपिंग प्रकरणातील चौकशी सुरू असल्याने रशियाच्या खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने बंदी घातली आहे.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 65 दिवसांपूर्वी आयओसीने हा निर्णय घेतला आहे.

आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यासंदर्भात बोलताना म्हणाले की रशियावर खेळांच्या अखंडतेवर आक्रमण केल्याचा आरोप आहे. जे रशियन खेळाडू त्यांनी डोपिंग केलेले नाही हे सिद्ध करतील त्यांना स्पर्धेत सहभागी होता येईल मात्र ते रशियाच्या नाही तर आयओसीच्या बॅनरखाली खेळतील.

रशियाने 2014 च्या सोची हिवाळी ऑलिंपिकचे यजमानपद भूषविले होते तेव्हा खेळाडूंनी डोपिंग केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने 2018 च्या हिवाळी स्पर्धांत रशियावर बंदी घातली गेली आहे.

LEAVE A REPLY

*