ऋषी कपूर यांच्या आगामी ‘मुल्क’चा ट्रेलर रिलीज

0
मुंबई- नुकताच दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या आगामी मुल्क या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून या चित्रपटात बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, तापसी पन्नू, आशुतोष राणा, प्रतीक बब्बर, रजत कपूर आणि मनोज पाहवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुल्क या चित्रपटात देशद्रोहाचा आरोप असलेल्या एका मुस्लीम कुटुंबियांची कथा मांडण्यात आली आहे. मुस्लीम कुटुंबातील मुलाला (प्रतिक बब्बर) देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संशयाच्या आधारावर पोलीस अटक करतात.
यानंतर कुटुंबाला देशद्रोहाच्या आरोपांना सामोरे जावे लागते. कुटुंब प्रमुख असलेली व्यक्ती ( ऋषी कपूर ) ठरवते की, आपल्यावर असलेला हा कलंक दूर करेल आणि यातूनच सुरू होतो एक संघर्ष. त्यांना काही लोक पाकिस्तानात जाण्याचे टोमणे मारायला लागतात. सामाजिक परिस्थिमुळे वैतागल्यावर आपला सन्मान परत मिळावा यासाठी ते न्यायालयाचा दरवाजा ठोठवतात. यात तापसी पन्नू वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाची कथा बनारस शहराच्या पार्श्वभूमीवरची आहे. तापसी पन्नू आणि आशुतोष राणा यांचा कडक डायलॉग ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. ऋषी कपूर अत्यंत प्रभावी वाटत असून येत्या 3 ऑगस्ट रोजी देशभक्तीने ओथंबून भरलेल्या संवादांचा मुल्क हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

*