‘रनफॉर पीस’ मधून स्वच्छतेचा संदेश; महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगर रायझिंगचा उपक्रम

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्याबाबात जागृती निर्माण करुन सामाजिक संदेश देणार्‍या नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त शहरात रनफॉर पीस मॅरेथॉन घेण्यात आली. यामध्ये ग्रुपच्या सदस्यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवून शांततेचा व सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच वाडिया पार्क क्रीडा संकुलच्या आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मॅरेथॉनचे प्रारंभ पहाटे वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधीजींच्या पुतळयास अभिवादन करुन करण्यात आला. यामध्ये धावपटू 3, 5 व 10 कि.मी. धावले. मॅरेथॉनच्या समारोपा नंतर ग्रुपच्या सदस्यांनी हातात झाडू, फावडे घेवून वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या परिसराची स्वच्छता केली. दोन तास चाललेल्या स्वच्छता अभियानाने वाडियापार्कचा परिसर चकाचक झाला. या उपक्रमात संदिप जोशी, अमृत पितळे, मनिष सोमाणी, गौतम जायभाय, विलास भोजणे, प्रसाद तनपुरे, योगेश खरपुडे, योगेश बजाज, डॉ.महेश मुळे, अंबादास हुलगे, अ‍ॅड.अशोक धायगुडे, अ‍ॅड.अशोक बारगजे, अमोल सायंबर, डॉ.रोहित गांधी आदिंसह मास्टर माईंड अ‍ॅकडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने उत्तम आरोग्य व सामाजिक जागृतीसाठी दर महिन्याला मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंती दिनी या मिनी मॅरेथॉनमध्ये धावून जनजागृतीवर सामाजिक संदेश दिला जातो. तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी होणार्‍या मॅरेथॉनमध्ये नगर रायझिंग ग्रुपचे सदस्य सहभाग होत असतात. नुकतेच सातारा येथे झालेल्या हिल मॅरेथॉनमध्ये नगर रायझिंगच्या 18 सदस्यांनी सहभाग नोंदवला होता.

LEAVE A REPLY

*