मुलांना शिकवूया योग

नियमित योग केल्यास मुलांचे शरीर लवचिकपणा येतो. योग अभ्य़ासात श्वसनाच्या तंत्राचा वापर करून प्रत्येक आसनाच्या मदतीने शरीराच्या विविध क्रिया कशा सुरळीत होतात ते मुलांना शिकता येते. योगामुळे मुले सजग होता योगाच्या माध्यमातून शरीराचा सन्मान कसा करावा, शरीराची काळजी कशी घ्यावी या सर्व गोष्टी कळतात.

रोगप्रतिकारक्षमता वाढते –
योग अभ्यास हा शरीराला ताकद देणाराच आहे. त्यामुळे प्रतिकारक क्षमतेत सुधारणा होते आणि ती मजबूत होण्यास मदत होते. लहान वयात मुलांना पण, अपचन, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता होणे अशा तक्रारी जाणवतात. नियमित योगासने केल्या मुलांमध्ये या तक्रारी कमी होतात. पचनसंस्था मजबूत होते. योगअभ्यास केल्याने हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने होतो तसेच शुद्ध रक्ताचे संचलनही होते. जीवनशैली खराब झाल्याने मुलांना अनेक विकार जडतात. त्याचबरोबर मोबाईल आणि टीव्ही यांचा अतिरेकी वापर करत असल्याने मुले एकाच जागी बसून असल्याने मुलांमधील स्थौल्य वाढते आहे. या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे योग.

आत्मविश्वासात वृद्धी-
नियमित योगअभ्यास केल्याने आनंदाचे हार्मोन्स एडोमॉर्फिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर निरोगी, मन आनंदी राहाते. व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. आनंदी मन आणि आत्मविश्वास यामुळे व्यक्तीला आपल्या कामात रस वाढतो. मुलांच्या बाबतीत अभ्यास, खेळ आदींमध्ये अधिक एकाग्र होतात. त्यामुळे यश मिळते. त्याशिवाय मुले स्वतःवर लक्ष केंद्रीत करणे शिकतात, स्वतःच्या चुका लक्षात घेऊन त्यात सुधारणा करू शकतात.

यशाचा राजमार्ग-
योग अभ्यासामुळे मुलांना त्यांच्या नेमक्या भावना समजून घेणे, भावनांवर नियंत्रण मिळवणे आणि त्यानुसार योग्य वर्तणूक करणे यासाठी मदत होते. मनाच्या अवस्थेवर ल नियंत्रण मिळवणे योगमुळे शक्य होते. अंतर्मनाचा आनंद शोधण्यास योगमुळे मदत मिळते. मनाला सकारात्मक विचार करण्याची सवयही लागते. सकारात्मक विचारांमुळे कठीणातील कठीण कामही सहजपणे करून टाकण्यास प्रेरणा मिळते. त्याचबरोबर कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीचा धीर, हिंमत मिळते. योगमुळे कठीण परिस्थितीला घाबरून जाता लक्ष्य गाठण्याच्या मार्गात डगमगू नका हे देखील शिकता येते.