Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

Breaking : पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या

Share
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचं प्रकरण गाजलेल्या पुण्यात आता विनायक शिरसाट या माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. विनायक शिरसाट यांचा मृतदेह दरीत संशयास्पदरित्या आढळून आला आहे. विनायक शिरसाट हे शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते होते.

शिवणे येथील उत्तमनगर परिसरात राहणारे विनायक शिरसाट हे ५ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. त्यांच्या भावाने यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.

सोमवारी दुपारी पोलिसांनी शिरसाट यांचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता त्यांचा मोबाईल मुठा गावाच्या हद्दीत असल्याचे समोर आले. या आधारे पोलिसांनी मुठा गाव आणि लगतच्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली. या दरम्यान पिरंगूट ते लवासा मार्गावरील घाटात विनायक शिरसाट यांचा मृतदेह सापडला.

त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची हत्या झाल्याचे समजते. शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!