Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

भारतात दहशत पसरवण्यासाठी दाऊदने आखला होता RSS नेत्यांच्या हत्येचा प्लॅन

Share
नवी दिल्ली :कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर भारतात पुन्हा एकदा दहशत पसरवण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता आहे. विशेष शाखेने अटक केलेल्या तीन आरोपींच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. या आरोपींना केरळ आणि कर्नाटकमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन नेत्यांची हत्या करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

देशात दहशत पसरवण्यासाठी दाऊद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)नेत्यांची हत्या करायची योजना आखत होता, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी विशेष पोलीस पथकाने वली मोहम्मद सैफी, शेख रियाजुद्दीन उर्फ राजा आणि तस्लीम या तीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. या तिघांवर केरळ आणि कर्नाटकमधील RSS नेत्यांची हत्या करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यासाठी वली मोहम्मद सैफी याला दुबईतून फोन आला होता. यावेळी RSS च्या नेत्यांना ठार मारण्यासाठी त्यांना दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

हा कट रचण्यात पाकिस्तानमधील गुलाम रसूल आणि आयएसआयसाठी काम करणाऱ्या अब्दुल लतीफ याचा समावेश यांचा हात असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांना डी कंपनी पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय आहे. त्यासाठी डी कंपनीकडून आयएसआयची मदत घेतली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या कटात दाऊदचा सहभाग आहे असे तूर्तास म्हणता येणार नाही. मात्र, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेली माहिती, फोन कॉल डिटेल्सच्या आधारावर दाऊदही कटात सहभागी असल्याचा दाट संशय आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!