Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

मॉब लिचिंग इतर देशात घडतात, भारतात नाही – सरसंघचालक मोहन भागवत

Share

मुंबई/नागपूर | वृत्तसंस्था

मॉब लीचींग सारख्या घटना इतर देशांत घडतात. भारतात या घटना घडत नाहीत. जगात भारताची प्रतिमा चांगली आहे. भारतीय शिक्षण प्रणाली अजून सुधारली पाहिजे. तसेच भारताच्या पूर्ण सीमेवर अधिक सैनिकांची सध्या गरज असल्याचे भागवत म्हणाले. ते नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी केंद्रीय वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नागपूरमध्ये संघाच्या पेहरावात संचालनात सहभाग घेतला.

दसऱ्याच्या निमित्ताने आज ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला दसऱ्याचे मेळावे प्रचाराचे मेळावे होत आहेत. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरमध्ये मेळावा पार पडला.

यावेळी भागवत यांनी चांद्रयान मोहिमेचे कौतुक केले. देशातील आर्थिक परिस्थितीवर सरसंघचालकांनी चिंता व्यक्त करत ते म्हणाले की सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्यामुळे यावर चर्चा करत राहणे बंद केले पाहिजे.

देशात संघाच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत. इम्रान खानही सध्या शिकला आहे. देशातील शिक्षणाचा स्तर सुधारला गेला पाहिजे. उदारता ही आमची परंपरा, आपल्याला काही आव्हानांचा सामना करावा लागेल असेही ते म्हणाले. केंद्र सरकारचा अजेंडा कधीच लपून राहिलेला नव्हता. आर्थिक मंदीवर सातत्याने चर्चा करू नये, सरकारने आर्थिक मंदीवर उपाययोजना नक्कीच केल्या आहेत.

मोहन भागवत उवाच 

 • भारताच्या पूर्व सीमेवर अधिक सैनिकांची गरज आहे- भागवत
 • गावात पाण्यावरून भांडण झाल्यानंतर भगवान गौतम बुद्धाने ते सोडवले होते- भागवत
 • मॉब लिंचिंगच्या घटना बाहेरच्या देशात घडतात, आपल्या देशात नाही- भागवत
 • एका बाईला सर्वजण दगड घेऊन मारायला आले, तेव्हा येशू ख्रिस्त तिथे येऊन कुणी पाप केले नसेल त्यानेच या बाईला मारावे असे म्हटले होते- भागवत
 • आमच्याकडे क्लिचिंगच्या घटना कधीच घडल्या नाहीत- भागवत
 • लिंचिंग हा शब्द बाहेरून आला आहे. आमच्याकडे लिंचिंग कधीच नव्हते- भागवत
 • अशा हिंसक घटनेत संघाचा काहीएक संबंध नसतो. उलट संघ अशा घटना रोखण्याचे काम करतो- भागवत
 • एखाद्या समुदायातील १०-५ लोकांनी कुणावर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही- भागवत
 • देशात केवळ एकाच समाजाने दुसऱ्या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर इतर समाजातील लोकही इतर समाजावर अत्याचार करतात- भागवत
 • आपल्या सैनिकांचे मनोबल उत्तम आहे- भागवत
 • देशाला सागरी सुरक्षितता वाढवण्याची गरज आहे- भागवत
 • आपला देश पूर्वीपेक्षा आता अधिक सुरक्षित- भागवत
 • एका देशात दोन राज्यघटना चालू शकत नाही- भागवत
 • काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे मोहन भागवत यांच्याकडून स्वागत
 • चांद्रयान मोहिमेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले-भागवत
 • चांद्रयान-२ अभियानामुळे लोकांच्या मनात आम्ही करू शकतो हा आत्मविश्वास जागृत झाला- भागवत
 • साहसी निर्णय घेण्याचे मोदी सरकारमध्ये सामर्थ्य आहे- भागवत
 • लोकशाही भारताला नवीन नाही. प्राचीन काळापासून ही व्यवस्था भारतात होती. पश्चिमी राष्ट्रांनी हे समजू नये की लोकशाही पश्चिमी देशांकडून आम्ही घेतले- भागवत
 • केद्रात भाजप सरकार आल्याने देशात काही तरी व्हायला लागले आहे असा विश्वास लोकांना वाटू लागला. यामुळेच त्यात सरकारला जनतेने पुन्हा निवडून दिले- भागवत
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!