Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गोरगरिबांच्या मदतीसाठी संघ स्वयंसेवक सरसावले; अन्नधान्य वाटप; ट्रक चालकांना जेवण

Share
गोरगरिबांच्या मदतीसाठी संघ स्वयंसेवक सरसावले; अन्नधान्य वाटप; ट्रक चालकांना जेवण, RSS giving helping hand to poor and truck drivers

नाशिक । कुंदन राजपूत

करोना संकटात लाॅकडाऊनमुळे गोरगरिबांना दोन वेऴेचे अन्न मिळावे यासाठि मदतीचे हजारो हात पुढे येत असून राष्ट्र कार्यात नेहमी दक्ष असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यात स्व:ताला झोकून दिले आहे. ट्रक चालकांना जेवण देण्यापासून ते गोर गरिबांना अन्नधान्य वाटपाचे काम स्वयंसेवकांकडून हाती घेण्यात आले आहे.

संकट काळात माणुसकी हा एकमेव धर्म असतो. तेथे जात, पात, धर्म या भेदाच्या भिंती गळून पडतात. करोना संकटात हे दृश्य नाशिकमध्ये पहायला मिळत आहे. ‘माणसाने माणसाशी मानसाप्रमाणे वागणे’ हा धर्म अंमलात आणत विविध धार्मिक, स्वयंसेवी संघटना व राजकीय पक्ष गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जात अाहे.

आरएसएसने देखील मदत कार्यात स्व:ताला वाहून घेतले आहे. देशभरात लाॅकडाउन लागू झाल्यावर विल्होळी, अाडगाव व नाशिकरोड येथील ट्रक ट्रर्मिनलमध्ये शेकडो ट्रकचालक अडकले होते. हाॅटेल व सर्व उपहारगृह बंदमुळे ट्रक चालकांची उपासमार होत होती. यावेळी संघाकडून सलग तीन दिवस ट्रक चालकांना पोळि, भाजी व चटणीचे जेवणाचे डब्बे पुरविण्यात आले. त्यामुळे ट्रक चालकांची उपासमार टऴली. डब्बे पुरविण्यासाठि स्वंयमसेवकांना आवाहन करण्यात आले होते.

त्यांनी देखील या आवाहनाला साद देत संकट कोणतेही असो स्वयंसेवक मदतीसाठी नेहमी दक्ष असतो हे दाखवून दिले. आता ट्रक चालकांना जेवणाची व्यवस्था ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून केली जात आहे. लाॅकडाउनमुळे हातावर पोट असणार्‍यांचे सर्वाधिक हाल झाले असून उपासमारीचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. गोरगरिबांचे हाल होउ नये व किमान त्यांना दोन वेळेचे अन्न मिळावे यासाठि संघाकडून अन्न धान्य वाटप केले जात आहे.

प्रत्येक व्यक्तिला एक किलो तांदूळ व अर्धा किलो डाळ वाटप केली जात आहे. उच्च भ्रू लोकांनी या मदत कार्यात सहभागी होऊन अन्नधान्य दान करावे असे आवाहन संघाकडून केले जात आहे. त्यास उस्त्फ़ूर्त प्रतिसाद लाभत असून पुढील एक आठवडाभर वाटप करता येईल एवढे अन्नधान्य जमा झाले आहे.

वडाळागाव, इंदिरानगर, विनयनगर येथील झोपडपट्टीतील गोरगरिबांना हे धान्य वाटप केले जात आहे. या उपक्रमामुळे ज्यांचे तळहातावर पोट हे त्यांची जेवणाची अबाळ होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. संचारबंदी असल्यामुळे मदत वाटपात अडथळा येऊ नये यासाठी इंदिरानगर, राजीवनगर, सिडको अशा विभागनिहाय टीम तयार करण्यात आल्या आहेत. पोलिस देखील मदत कार्यात सहकार्य करत आहे.


स्वयंसेवकांची फळी मदतीसाठी

लाॅकडाऊनचा कालावधीत वाढ होऊ शकते ही शक्यता गृहीत धरता संघाकडून पुढील नियोजन करण्यात आले आहे. अन्नधान्य बॅंक तयार करणे, रक्त पेढीच्या माध्यमातून रक्तसाठा करणे, जे ज्येष्ठ नागरीक व विधवा महिला की ज्यांना कोणाचा सहारा नसेल अशांच्या मदतीसाठि घरपोच स्वयंसेवक उपलब्ध करुन देणे याचे नियोजन सुरु आहे.


राष्ट्रसेवा हाच धर्म आहे. जे गोरगरीब हे त्यांना अन्नधान्य देण्याचे काम सुरु आहे. व्हाटस्अपद्वारे नागरीकांना अन्नधान्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभत आहे. ट्रक चालकांना जेवणाचे डब्बे पुरवले जात आहे. तसेच सोशल डिस्टनचे नागरिकांनी पालन करावे यासाठी स्वयंसेवक जनजागृती करुन प्रशासनाला मदत करत आहे.

– दीपक कुलकर्णी, सहसेवा प्रमुख, नाशिक शहर, आरएसएस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!