अच्छे दिन : पेट्रोल-डिझेल आणखी चार रुपयांनी महागणार?

0
नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसांत या किंमती आणखी भडकण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक निवडणुकीच्या आधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता इंधन दरवाढीने डोकंवर काढलंय. कर्नाटक निवडणुकीपूर्वी १९ दिवस पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. इंधनाचे दर १९ दिवस स्थिर ठेवल्याने पुरवठादारांचा प्रतिलिटर नफा केवळ ३१ पैशांपर्यंत खालावला होता, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे. लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसात या किंमती आणखी भडकू शकतात.

कच्च्या तेलाचा भडका

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. कच्य्या तेलाचा प्रतिबॅरलने ८० अमेरिकी डॉलरचा टप्पा पार केला. नोव्हेंबर २०१४नंतर प्रथमच कच्च्या तेलाने ही चिंताजनक पातळी गाठली आहे. कच्च्या तेलाचा मोठा पुरवठादार असणाऱ्या इराणने पुरवठाकपात केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये झालेली सर्वाधिक मोठी वाढ समजली जात आहे.

LEAVE A REPLY

*