Type to search

देश विदेश शैक्षणिक

आरआरबी पँरामेडिकल परीक्षा: रेल्वे पँरामेडिकलचे वेळाकपत्रक प्रसिद्ध; प्रवेशपत्र लवकरच मिळणार

Share

नवी दिल्ली: रेल्वे भर्ती मंडळाने पॅरामेडिकल श्रेणी अंतर्गत विविध पदांसाठीचे भर्ती वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या महिन्यात रेल्वे भर्ती परीक्षा (आरआरबी परीक्षा) घेण्यात येणार आहे.

पॅरामेडिकल भर्ती परीक्षा संगणक आधारित असणार आहे (आरआरबी पॅरामेडिकल सीबीटी परीक्षा). परीक्षा दिनांक १९, २० आणि २१ जुलै रोजी होणार आहे. परीक्षार्थी ९ जुलै २०१९ला परीक्षा केंद्राची आणि इतर परीक्षा संबंधित माहिती तपासू शकणार आहेत. याच दिवशी परीक्षा तपासण्यासाठी रेल्वे आरआरबीच्या सर्व वेबसाइट्सवरील लिंक सुरु करेल. एससी/एसटी परीक्षार्थी दिनांक ९ जुलैपासून प्रवासी पास डाउनलोड करू शकतील. या दिवशी, मॉक चाचणीची लिंक देखील सुरु करण्यात येईल. परीक्षार्थी मॉक टेस्टमधून परीक्षेची तयारी करू शकतील.

प्रवेश पत्र परीक्षेच्या ४ दिवस आधी रेल्वे भर्ती मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांनी  नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाकून लॉग इन करून प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे. आरआरबी १,९३७ पदांवर पॅरामेडिकल श्रेणीच्या अंतर्गत भरती केली जाणार आहे. यामध्ये डायटीशियन, स्टाफ नर्स, डेंटल हाइजीनिस्ट इत्यादीसारख्या पोस्ट्स आहेत.

 

अशी असेल परीक्षा

– परीक्षेत १०० प्रश्न असतील.

– परीक्षे मध्ये मल्टीपल चाँईस क्युइस्टीअन असतील

– एक तृतीयांश नेगेटिव्ह मार्किंग असेल.

– परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!