Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

दिल्लीतील दंगलीमागे काँग्रेस – आआपाचा हात; ‘सीएए’ला पक्षाचा पाठिंबा – ना.रामदास आठवले

Share
RPI support CAA Ramdas Athavale

नाशिक । प्रतिनिधी

‘सीएए’ मुद्यावरुन मुस्लिम व दलितांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. या मुद्यावरुन काँग्रेस मुस्लिमांना भडकविण्याचे काम करत आहे. दिल्लीमध्ये जी दंगल घडली त्यामागे काँग्रेस व आम आदमी पक्षाचा हात असल्याची शंका व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी के्ंरदीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच, सीएए व एनआरसीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

काळाराम सत्याग्रह अभिवादनासाठी सोमवारी (दि.2) नाशिकमध्ये आले असता त्यांनी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. दिल्ली घटनेचे देशात इतरत्र पडसाद उमटले नाही, ही चांगली बाब आहे.

मुस्लिमांनी सीएए कायदा समजून घ्यावा. सीएए कायद्यामुळे दलित अडचणीत येणार नाही.देशात काही ठिकाणी दलितांवर अत्याचार होत आहे. मात्र, पुर्वीपेक्षा दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. पंंतप्रधान मोदी हे संविधानात बदल करतील, हा अपप्रचार सुरु आहे.

ते संविधानाला धर्मग्रंथ मानतात, असे सांगत मोदी ‘सबका साथा सबका विकास’ या धोरणानूसार काम करत असल्याचे ते म्हणाले. देशात जनणगना होणार असून ती ओबीसी, मराठा, दलित अशी जातनिहाय झाली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. नवबौध्दांना सवलती दिल्या जात नाही.

याबाबत कायद्यात बदल करावा, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुढील 16 मे ला नाशिक शहरात पक्षाचे अधिवेशन घेणार असून त्यास भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना बोलविणार असल्याचे त्यांनी सांगितले.


उध्दव ठाकरे यांना ऑफर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र, हे सरकार जादा दिवस टिकणार नाही, असे सांगत मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम जोरात सुरु असल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे, अशी ऑफर त्यांनी आठवले यांनी दिली.


मी असताना राज ठाकरे कशाला हवे

मनसे व भाजप एकत्र येणार का, याबाबत त्यांना विचारले असता भाजपने राज ठाकरेंना सोबत घेऊ नये, असे मत त्यांनी मांडले. जो पर्यंत मनसे त्यांची भूमिका बदलत नाही, तोपयर्ंंत विचार केला जाऊ नये. तसेच, मी सोबत असल्याने राज यांची गरज नाही, असा मिश्किल टिपणी त्यांनी केली.

Leave a Comment

error: Content is protected !!