शिर्डीतील माझ्या पराभवाला कार्यकर्तेच जबाबदार : ना. आठवलेंनी सुनावले खडेबोल

0

रिपाइंची माणसं निवडून का येत नाहीत?

राहाता (तालुका प्रतिनिधी) – कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्त पाळणे महत्वाचे आहे. नेता बनायचे असेल तर शिस्त पाळणे गरजेचे असते.
माझ्या शिर्डीतील पराभवाला कार्यकर्तेच जबाबदार असून घराघरात गावागावांत जाऊन प्रचार केला असता तर माझा लाखाच्या मतांनी पराभव झाला नसता.
मला कार्यकर्त्यांनीच हरविले आहे. इतर पक्षात ज्या पध्दतीने शिस्त पाळली जाते ती आपल्याकडे पाळली जात नाही.
प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे तुमची माणसे का निवडून येत नाहीत. समाजात तुमची पत किती आहे हे पहा.कार्यकर्त्यांनी आता शिस्त पाळली नाही तर पक्षच बरखास्त करून पुन्हा पँथरचे काम करावे लागेल, अशा कठोर शब्दात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.
शिर्डी जवळील सावळीविहिर येथील के. सी. पांडे मैदानात काल मंगळवारी आरपीआयच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री राम शिंदे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महिला आघाडी नेत्या सीमा आठवले, आ. स्नेहलता कोल्हे, आ. विनायक मेटे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, भुपेश थुलकर, बाबा कदम, विजय वाकचौरे, राजाभाऊ सरोदे,  चांगदेव जगताप, अशोक गायकवाड, दीपक गायकवाड आदी उपस्थित होता.
ना. आठवले म्हणाले, आपल्या पक्षाला साठ वर्ष झाली तरी आपले उमेदवार निवडून येऊ शकत नाही, मात्र महादेव जानकरांच्या पक्षाला 14 वर्षे झाली. त्यांचे किती सदस्य जिल्हा परिषद, नगरपरिषदेला निवडून येतात याच परिक्षण करणे गरजेचे आहे. आपली समाजात जी पत आहे तिचा वापर उमेदवार निवडून आणण्यासाठी करण्याची गरज आहे. भाजप सोबत युती झाली त्यांनी मत दिली नाही तरी आपण आपल्या हिंमतीवर निवडून आले पाहिजे.
आपण नीट पक्ष बांधनी केली नाही तर मी पक्ष बरखास्त करून टाकणार आहे, असे खडेबोल ना. आठवले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सुनावले.     ना. आठवले म्हणाले की, शरद पवारांची व माझी मैत्री होती ती आजही आहे. मी शिर्डीत हरलो याचे दु:खही पवार साहेबांना आहे. मला हरवलं व ते ही हरले. मी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडलं व सेना भाजपला जोडलं. सरकारच्या विविध योजना आहे. त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवा. कार्यकर्त्यांनी यापुढे पक्ष मजबूत करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
समाज्यातील मागास घटकांना न्याय देण्यासाठी तसेच आरपीआय पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यात घेतलेल्या विशेष ठरावाची मागणी केली आहे ती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार मागे राहणार नाही, राज्यातील मागास प्रवर्गासाठी नुकताच राज्य शासनाने असा निर्णय घेतला आहे की, या पुढे जात पडताळणी  करण्यासाठी नवे प्रकरण दाखल करण्याची गरज राहणार नाही.
त्यासाठी रक्तातील एकाच पडताळणी प्रमाणपत्र असल्यास नवीन प्रकरणात त्या प्रमाणपत्राच्या नुसत्या सत्यप्रत लावल्यास काम होणार आहे अशी माहिती राज्याचे महसूल महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की, आरपीआयचे केलेल्या ठरावांना समर्थन दिले आहे. जिल्ह्यात हा मेळावा घेतला म्हणून पक्षाचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.
ना. सदाभाऊ खोत म्हणाले की, देशात आणि राज्यात  सत्ता प्राप्त करण्यासाठी या पक्षाची भूमिका महत्त्वाची असून तळागळातील सामान्याला घेऊन लढणारा हा पक्ष आहे. घटक पक्षांना बरोबर घेऊन जाने व समन्वयाची भूमीका आठवले यांनी बजावली, असे ते म्हणाले.ना महादेव जानकर म्हणाले की, आठवले साहेबांचे नशीब चांगले कोनतेही सरकार असले तरी मंत्रीपद त्यांनाच मिळते.
पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षाचे बळ वाढविण्याची गरज आहे सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चला सर्व बरोबर आले तरच आपण सत्तेत जावू असे सांगीतले. आपल्या पक्षातले आमदार खासदार निवडून नाही आले तर हाच भाजप आपल्याला विचारणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी सीमा आठवले, मंजू सिब्बल, कुमारसिंग बोधी, पप्पू कागदे, आशा कागदे प्रा. राजू सरवदे, बाबूराव कदम यांची भाषणेे झाली.
राष्ट्रिय अधिवेशनात मांडण्यात आलेले ठराव...बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उदिष्ट पुर्तीचे अभिवचन भारतीय जनतेला देणे.हिंदू कोडबिल मंजूर करणेनदीजोड प्रकल्प करणे बाबद.भूमीहिन शेतमजूरांना 5 एकर जमिन देणेबाबद…सैन्य दलात दलीत समाजासाठी राखीव जागा ठेवावी.झोपडपट्टी धारकांसाठी स्लम प्रोजेक्शन अ‍ॅक्ट करणे जातीचा अंतासाठी1 आंतरजातीय विवाह करणारास 5 लाख रूपये अनुदान देण्यात यावे. मराठा,धनगर तसेच आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण द्यावेभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव.महाराष्ट्रातील मागासवर्गीय आर्थिक महामंडळाचे कर्ज माफ करावे.NDमध्ये आठवले गटाचा समावेश आणी मंत्रीपदाबद्दल अभिनंदनाचा ठराव…SC/ST/OBC यांचे शासकीय सेवेतील पदोन्नति बाबद कायदा करणे….

आठवले यांचे पुत्र जित आठवले यांना या अधिवेशनात बाल रिपब्लीकन पार्टीचे अध्यक्ष म्हणून घोषीत केले 15 वर्षाच्या आतील मुलांचा या संघटनेत समावेश असेल.

LEAVE A REPLY

*