Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

Video: युके मधिल आधुनिकतम तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करा-टॉम

Share

नाशिक । प्रतिनिधी

उद्योगांच्या क्षेत्रात युकेने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. तंंत्रज्ञानाच्या क्षेत्रात युके विकसनशिल शहरांशी व्यवसायीक आदान-प्रदानातून संबंध प्रस्तापित करु पहात आहे. नाशिक एक विकसनशिल शहर असल्याने युकेच्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठीं गुंतवणूक करण्याचे आवाहन ब्रिटीश ट्रेड कार्यालयाचेे भारतातील उपसंचालक टॉम मोटरशेड यांनी केले.

हॉटेल ताज येथे निमा व ब्रिटिश ट्रेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युके मधिल व्यवसाय संधी’ या विषयावरील चर्चासर्त्रात टॉम बोलत होते. यावेळी निमा अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी यानी नाशिकच्या क्षमतांची माहीती सादर केली.त्यांनी त्यात नाशिकच्या एएसएमई क्षेत्राची व्याप्ती, परिसरातील इको सिस्टिम, मोठ्या उद्योगांचे जाळे यांची सविस्तर माहीती सांगितली.

यावेळी बोलताना टॉम यांनी युके मधिल बलस्थानांची माहीती दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशोधन व विकासावर खर्च केला जात आहे. त्यासोबतच नवनवीन कल्पना विकसीत करणे, कर्मचार्‍यांना अती आद्यावत प्रशिक्षण, इन्स्ट्रक्टर तयार करणे, या माध्यमातून विकासाला गती देण्यात आलेली असल्याचे सांगितले.राज्य शासनासोबत विकासासाठीचा करार करण्यात आलेला असून याबाबत पूण्यातील उद्योगांशी भागिदारी करारही करण्यात आला असल्याचे सांगितले.

ब्रिटीश ट्रेड कार्यालयाचे प्रमुख अवनिश मल्होत्रा यांनी भारतातील व्यवसाय संदींची माहीती देतानाच युकेच्या नवनवीन विकास कार्यक्रमावर प्रकाश टाकला. येणार्‍या काळात नाशिकला‘लो कार्बन व्हेईकल शो (दि. 5 व 6 सप्टेंबर) सी.व्हि शो (एप्रिल 2020) व ऑटो मार्केट शो(जून 2020) चे आयोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच सूयोग्य भागीदारांशी करारही करण्याचा मनोदय स्पष्ट केला. त्यासाठी उद्योगांशी पूढील 10 ते 15 वर्षांचा ‘रोड मॅप’ तयार करण्याचा मनोदय असल्याचे स्पष्ट केले.

पश्चिम विभागाचे प्रमुख विलीयम हॉपकिन्सन यांनी येणार्‍या काळातील विविध संधींची माहीती दिली. तसेच युकेव्यवसायांना सक्षम करण्यासाठी विविध उपाय याजना करीत आहे. त्यांचा लाभ घेण्यासाठी वेगाने विकसित होणार्‍या नाशिक विभागातील उद्योजकांनी युकेमध्ये गूंतवणूक करुन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सूरूवातील निमाच्या वतीने हर्षद ब्राम्हणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास आहीरे, राजेंद्र अहिरे, संजय सोनवणे, उदय रकीबे , जितेंद्र शिर्के, श्रीकांत पंडीत आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!