कुजलेल्या अवस्थेत तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला; कडवा धरणालगतची घटना

0
वाडीव-हे | इगतपुरी तालुक्यातील कडवा धरण क्षेत्रातील एका पडक्या इमारतीत दोन अल्पवयीन तरुण तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ  उडाली आहे.  परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर  सदर घटना उघडकीस आली. वाडीव-हे पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

घोटी सिन्नर महामार्गाच्या पूर्वेकडे असलेल्या कडवा धारणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या असलेल्या एका पडक्या खोलीतुन वास येत होता. जाऊन बघितले असता एक तरुणी व तरुणाचा मृतदेह फुगलेल्या स्थितीत आढळून आल्याची माहिती कडवा धरणाचे निरीक्षक अच्युत जाधव यांनी वाडीव-हे पोलीस स्टेशनला दिली.

खबर मिळताच वाडीव-हे पोलिस पथक तत्काल घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रेताची चौकशी केली असता या दोघांची ओळख पटली, असून तरुणाचे नाव धर्मा बबन मधे (वय १७) रा.गिरेवाड़ी ता.इगतपुरी आणि शोभा संतु पथवे (वय-१७, रा.धारनोली ता.इगतपुरी अशी त्यांची नावे असून या दोघांनी आत्महत्या केली की यामगे काही घातपात आहे याबाबत पोलीस तपास करत आहे.

वाडीव-हे पोलिसांत याबाबत आकस्मात मृत्यची नोंद केली असून पुढील तपास पो.नि.सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि.शितलकुमार नाईक,हवा.शाम सोनवणे,करत आहेत.

LEAVE A REPLY

*