Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रोटा वायरस लसीकरणास आजपासून प्रारंभ; पाच लाख बालकांना देण्यात येणार लस

Share

नाशिक | प्रतिनिधी 

आजपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात रोटा वायरस लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरावर अनेक बालकांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे,निवासी वैद्यकीय अधिकारी( बाह्य संपर्क) डॉ.अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही डी पाटील, अधिसेविका सीमा काळे, महाविद्यालय प्राचार्या वंदना जिंझाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बाल मृत्यु रोखण्यासाठी जिल्हा स्तर वर लसीकरणाच्या माध्यमातून अनेक बालकांना मोफत लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे.
रोटा वायरस ही लस अत्यंत सुरक्षित असून बालकांना तोंडा द्वारे देण्यात येणार आहे.

एक वर्षाच्या आतील बालकांना ६ आठवडे, १० आठवडे व १४ आठवडे असे तीन वेळा ही लस देण्यात येणार आहे.या लसीकरणाच्या माध्यमातून अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यु वर नियंत्रण मिळण्यास मदत होईल अशी माहिती यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!