हिवरेबाजार देशाचे रोल मॉडेल : परदेशी

0

पंतप्रधान कार्यालयाच्या सचिवांकडून पाहणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसहभाग व सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शीपणे काम केले तर चांगले काम उभे राहू शकते. हिवरेबाजार हे राज्यच नाही तर देशासाठी आदर्श असे मॉडेल व्हिलेज आहे. जगभरात ईस्त्राईल नंतर हिवरेबाजार हे वॉटर ऑडीटींगची संकल्पणा राबवणारे गाव असल्याचे गौरवोद्गगार पंतप्रधान कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी काढले.
राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे स्नेही असलेले डॉ. परदेशी हे आपल्या कुटुंबासमवेत खास दिल्लीहून हिवरेबाजार येथील ग्रामविकासाची पाहणी करण्यासाठी आले होते. संपुर्ण दिवसभर गावात फिरून त्यांनी पाहणी केली. नागरीकांशी संवाद साधला.
परदेशी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टनुसार 2022 पर्यंत सर्वांना घरे, 2019 पर्यंत 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे रस्त्याने जोडली जाणार आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सर्वांना रोजगार व नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे.
राज्यात झालेल्या तुरीच्या अतिरिक्त उत्पादन व सरकारकडून सुरु असलेल्या खरेदी केद्रांबाबत ते म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात दिनांक 31 मे पर्यंत तूर खरेदी केली जाणार आहे.
परदेशी यांनी गावातील जलसंधारणाची कामे, ट्रेनिग सेंट्रर, ग्रामसचिवालय यांची पाहणी केली. हिवरेबाजारने गावपण टिकवून ठेवल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचेही कौतूक केले. गावात राबविल्या जाणार्‍या विवीध उपक्रमांचे त्यांनी माहिती घेतली. त्यांच्या हस्ते गावात ओपन जिमचेही उद्घाटन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*