नाशिकमध्ये नोकरी पाहिजे? ही बातमी तुमच्या फायद्याची. उद्या ७३० जागांची भरती

0
नाशिक | नाशिक येथे मंगळवार दिनांक ०६ रोजी ७६० रिक्त जागांसाठी रोजगार व उद्योजकता मेळावयाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रेाजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि नाशिक महानगरपालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय उपजिविका अभियान (DAY – NULM) यांचे संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याद्वारे बेरोजगार उमेदवारांना विविध कंपन्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता मंगळवारी (दि. ६) सकाळी १० ते सायं ३ वाजेपर्यत मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात या भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यात वेगवेगळी ७६० रिक्तपदे भरली जाणार असून मेळाव्याच्या निमित्ताने मुलाखतीसाठी विविध २२ कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत.

या कंपन्या करणार भरती : या मेळाव्यामध्ये नाशिक जिल्हयातील बॉम्बे इंटलीजेंन्स सिक्युरीटी इंडिया लि. नाशिक (एस.एस.सी. सिक्युरिटी गार्ड-१०० पदे), धुमाळ इंडस्ट्रीज, सातपुर (ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ग्रॅज्युएट-४ पदे, ऑपरेटर आयटीआय इलेक्ट्रेशियन ८ पदे), आर्ट रबर इंडस्ट्रिज लि.अंबड नाशिक (ट्रेनि -१५ पदे), जनरल मिल्स, माळेगाव-सिन्नर (ट्रेनि एच.एस.सी.-४० पदे, ट्रेनि इलेक्ट्रीकल-१६ पदे, ट्रेनि फिटर-२५ पदे, ट्रेनि डिप्लोमा इंजिजिनियर-१० पदे, एस.एस.सी ट्रेनि -१० पदे, एकुण- १०१ पदे), ईपीसी इंडस्ट्रिज लि अंबड नाशिक (एस.एस.सी ट्रेनि -२५ पदे), तापारीया टुल्स्‌ लि. सातपूर नाशिक (ऑन जॉब ट्रेनि -५० पदे, ट्रेनि अंडर निम ५० पदे, जनरल ट्रेनि २० पदे, टर्नर १० पदे, फिटर १० पदे, ग्राईडर १० पदे एकूण-१५० पदे), व्हिआयपी इंडस्ट्रिज लि सातपुर नाशिक (ट्रेनि ईलेक्ट्रीशन-१० ट्रेनि फिटर-१० एकुण-२०पदे),

विरगो बिपीवो र्सव्हिस प्रा लि अंबड नाशिक (ट्रेनि बिपीवो २० पदे), ईन्डोलाईन इंडस्ट्रिज प्रा लि.अंबड नाशिक (कारपेंटर- १०, पेंटर-१५, एकुण -२५ पदे),जहांगीरदार फुड्‌ प्रा लि.सातपुर नाशिक (मार्केटिंग एक्झीक्युटिव्ह १० आणि वर्कर १० पदे एकुण -२० पदे), कॅप्रिहन्स इंडिया लि एमआयडीसी अंबड (अप्रेंटिस-१५ पदे), सहयाद्री हॉस्पिटल वडाळारोड नाशिक

(स्टाफ नर्स/क्लिनिक असिस्टंट-५, स्टाफ नर्स डिप्लोमा नर्सिग/बीएससी नर्सिग-२५, क्लिनिकल असिस्टंट ग्रॅज्युएट मेडिकल-१०, फार्मासीस्ट-५ बी फार्म/ डी फार्म, एकुण-४५ पदे), फ्लायव्हिल रिंग गेयर प्रा लि एमआयडीसी सिन्नर (ट्रेनि मॅकेनिकल ईजिनिअर-१, ट्रेनि फिटर-२,

ट्रेनि ईलेक्ट्रीशीयन -२, एकुण -५ पदे), डेल्टा मॅग्नेट, लि. अंबड (ट्रेनि ईलेक्ट्रीयन-६, ट्रेनि फिटर-४, एकुण-१०), किर्लोस्कर ऑईल लि एमआयडीसी. अंबड नाशिक (अप्रेटिस मशिन ग्रांईडर-१० पदे), एचसीजी मानवता ऑनकॉलोजी कस्टमर केअर नाशिक (कस्टमर केअर -१०, स्टाप नर्स-२०, मार्केटिंग-५, क्लिनिकल असिस्टंट-५ एकूण-४०पदे),

झेनिथ मेटाप्लास्ट प्रा लि सातपुर नाशिक (डिझायनर डिप्लोमा ऑटोकॅड -५ पदे), पॅटको प्रेसिजन कॉम्पोनंट प्रा.लि. (क्वॉलिटी ईन्सुरन्स – बीएससी गणित/भौतिकशास्त्र-४ पदे, ट्रेनि-१० पदे),

डाटा मॅक्ट्रीक्स ग्लोबल मुंबईनाका नाशिक (ग्रॅज्युएट / डिप्लोमा-२५, पोस्ट ग्रॅज्युएट-२०, पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट-२०, एकूण-६५ पदे), डिजी डेटा सोल्युशन उंटवाडी नाशिक (ट्रेनि-२५), रिलायन्स निपॉन लाईफ ईन्सुरन्स कं.लि.नाशिक (महिला लाईफ प्लॅनिंग ऑफिसर-२०) अशी एकूण ७६० रिक्तपदे प्राप्त झाली आहेत.

याचप्रमाणे, स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या मेळाव्यामध्ये सर्वांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. येथे स्वयंरोजगार ईच्छूक उमेदवारांची नोंदणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल.

व अर्ज कार्यपध्दती माहिती प्राप्त करून अर्ज सादर करता येईल. यासाठी साधारणपणे शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, आधार/इलेक्शन कार्ड, रहीवाशी दाखला, रेशन कार्ड, अनुभव दाखला, व्यवसायासाठी जागा उपलब्धता, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. संबंधित महामंडळ व व्यवसाय आवश्यकतेनुसार यात कमी अथवा अधिक होऊ शकेल.

या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधार कार्ड,सेवायोजन नोंदणीसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करून यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला १५ अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी.

तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन Nashik job fair -11 या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅवप्लाय करावे.

यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी क्र. ०२५३-२५००६५३ वर संपर्क करावा किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या भागातील खालील बाजुस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline हया सुविधेचा उपयोग करावा.

इच्छूकांनी या मेळाव्यास वेळेवर उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक महानगरपालिका उपआयुक्त तथा प्रकल्प अधिकारी, दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय उपजिविका अभियानचे आर आर गोसावी आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक संचालक संपत चाटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*