Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सेल्फी

Exclusive : आता जर्नालिस्ट म्हणून तर कुठे वेटर्स म्हणून दिसणार ‘रोबो’

Share

सौदी अरेबियाचे रोबोटला नागरिकत्व तर त्याहीपुढे जात न्यूजीलंडच्या वैज्ञानिकांनी राजकारणी रोबोट बनवला आहे. 

एक आर्टिकल लिहण्यासाठी पत्रकाराला तीन तास लागतात तर तेच आर्टिकल एक रोबो तीन सेकंदात तयार करू शकतो. म्हणून आता पत्रकारितेत माणसांचे काम उरणार नाही. जर्नालिस्टला पर्याय रोबो असेल असे ब्रिटन आणि इतर देशात आता शोध लागत आहे.

तसेच चेन्नईतील “मोमो ” नावाच्या हॉटेलमध्ये वेटर्स म्हणून रोबो काम करतांना दिसत आहेत. रोबोटची बुद्धीमत्ता आणि मानवाची बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक असल्यामुळे आता जगभरात रोबोटचे राज्य असेल?

रजनीकांतच्या रोबोट’ सिनेमाची खूप चर्चा झाली होती तसेच हॉलिवूड सिनेमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. रोबोटिक्स बुद्धीमत्तेचे दर्शन ब्लेड रनर आणि टर्मिनेटर सारख्या हॉलिवूड रोबोट चित्रपटामध्ये झालेले होते

जगभरात नवलाईच्या अनेक घटना घडत असतात त्यातीलच एक घटना म्हणजे नुकतीच जगाच्या इतिहासात प्रथमच एका रोबोटला नागरिकत्व मिळालेले आहे , होय सौदी अरेबियाने एका रोबोटला नागरिकत्व दिले आहे आणि असे असणारा हा प्रथम देश आहे म्हणजेच जगातील ही पहिलीच घटना आहे.

सौदी अरेबियाने चक्क एका महिला रोबोटला नागरिकत्व दिलंय. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारखी ही सोफिया रोबोट दिसते.

सौदीची राजधानी रियाद मध्ये फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या व्यासपीठावर हा रोबोट नागरिकत्वाचा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात सोफिया नावाच्या रोबोटला सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले आणि त्याने तेव्हा त्यांनी सौदी अरेबियाच्या सल्तनतचे आभार मानले.

व्यापारविषयक लेखक अन्ड्रयू रौस सॉर्किन यांनी सोफियाच्या नागरिकत्वाची घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

नागरिकत्वाच्या घोषणेनंतर सोफियाच्या झालेल्या मुलाखतीत तिने ‘मी नागरिकत्व बहाल झालेला जगातली पहिली यंत्रमानव या ऐतिहासिक घटनेबद्दल सौदी अरेबियाचे आभार मानते ‘ असे सांगितले तसेच या गोष्टीचा मला अभिमान आहे.अशा शब्दांत सोफियाने आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी तिने यत्रंमानव हा माणसांसाठी धोका आहे का ? या चर्चासत्रातही सक्रिय सहभाग घेतला.
अशी माहिती हाती मिळालेली आहे कि, कृत्रिम बुद्धीला चालना देण्यासाठी, सौदी अरेबियाने रोबोटला नागरिकत्व दिले आहे.

कसे आहे हे रोबोट

  • सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.
  • धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली ही सोफिया आहे विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली अत्याधुनिक यंत्रमानव आहे .
  • या रोबोटची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते आपल्या रोजच्या कामाव्यतिरिक्त इतर प्रश्नांची उत्तरे देते.
  • सोफिया चेहऱ्यावरील हावभाव ओळखू शकते आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलू शकते
  • अनेक टी वही चॅनल्सना तिने मुलाखतीही दिल्या आहेत.

रोबोटमुळे रोजगारावर गदा येईल?

जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक अॅलन मस्क यांनी भविष्यात सर्वात जास्त धोका हा कृत्रिम बुद्धिमत्तेपासून आहे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील. असा इशारा काही महिन्यांपूर्वी दिलेला होता. कारण त्यांचे मते रोबोट प्रत्येक गोष्ट करण्यास सक्षम असतील.

आणि माणसांपेक्षाही रोबोट उत्तम काम करतील. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल. त्याला प्रतिउत्तर देतांना सोफिया मुलाखतीत म्हणाली कि, मी एक संवेदनशील रोबोट असेल मुलाखत घेणा-याने जेव्हा तिला आम्हाला वा”ईट भविष्याकडे जायचं नाहीये असं म्हटलं.” त्याला झटकन उत्तर देताना सोफिया म्हणाली कि तुम्ही काल्पनीक हॉलिवूड सिनेमे खूप बघतात वाटत . पण काळजी करू नका , जर तुम्ही मला नुकसान पोहोचवलं नाही तर मी देखील तुमच्याशी चांगलीच वागेल. मी एक स्मार्ट कम्प्युटर म्हणून असेल वर्च्युअल पॉलिटिशियन’….

‘राजकारणी’ रोबोट नुकतीच जगाच्या इतिहासात प्रथमच एका रोबोटला नागरिकत्व मिळालेले आहे, होय सौदी अरेबियाने एका रोबोटला नागरिकत्व दिले आहे पण आता त्याहीपुढे जात न्यूजीलंडच्या वैज्ञानिकांनी जगातला पहिलाच बुद्धिजीवी आणि राजकारणी रोबोट बनवला आहे. भविष्यात यंत्राचेच राज्य येण्याची शक्यता आहे कारण हा रोबोट २०२० मध्ये उमेदवार म्हणून निवडणुक लढविण्याची शक्यता आहे.

बुद्धीजीवी सॅम :

या रोबोटचे नाव सॅम असून न्यूजीलंडच्या निक गेरिट्सन नावाच्या व्यक्तिने याची निर्मिती केली आहे
राजकारणात जनतेच्या पूर्वग्रही विचारांवर प्रभाव टाकेल सॅम राजकारणात अनेक पूर्वग्रह आहेत. जगाभरतील देशांमध्ये जलवायू, परिवर्तन, प्रदूषण ,समानता या समस्या आहेत सॅम या विषयांवर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम करेल . या रोबोटमध्ये असलेला अल्गोरिदम मानवाच्या पूर्वग्रही विचारांवर प्रभाव टाकेल.

लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ) (handgeyogesh@gmail.com)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!