Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द मध्ये चोरी

राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द मध्ये चोरी

मालुंजे खुर्द – राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द माहाडुक सेंटर येथे रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सहा दुकाने, एक घर, पोस्ट आँफिस व मालुंजे खुर्द ची जिल्हा बँकेची शाखा व ज्ञानेश्वर सोळुंके यांचे घर या ठिकाणी धाडशी चोरी झाली आहे.

तब्बल ९० हजार रुपये घेवुन चोर फरार झाले आहे. मात्र बँकेचे सायरन वाजल्याने बँकेतील पैसै न घेताच चोरांनी पलायन केले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या