Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शहरात घरफोडीचे सत्र; एकाच दिवशी 4 घरफोड्या उघड

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहरात घरफोडीचे सत्र सुरू असून एकाच दिवशी शहरातील विविध भागात 4 घरफोड्या झाल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून हे सत्र सुरू असून पोलीसांचे प्रयत्न अपुर्ण ठरत असल्याची चर्चा आहे.

वडाळागावातील गोपाळवाडी येथे चोरट्याने 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान घरफोडी करुन 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. जयवंताबाई ज्योतिसिंग ठाकरे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडी फिर्याद दाखल केली असून खिडकीचे गज वाकवून चोरट्याने किंमती ऐवज लंपास केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जे. पी. गावीत हे तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत पेठरोड येथे आशा देवानंद सितान यांच्या घरात भरदिवसा घरफोडी करुन चोरट्याने 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्याने सोमवारी (दि.10) दुपारी अडीचच्या सुमारास घरफोीह करुन सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पवननगर येथील आदर्श नगर परिसरात रिचल वर्गीस यांच्या घरात घरफोडी करुन चोरट्याने सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 3 हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर चौथ्या घटनेत देवळाली गावातील शिवम कॉलनी येथे घरफोडी करुन चोरट्याने लॅपटॉप व मोबाइल लंपास केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार एन. व्ही. कुंदे हे तपास करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!