Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : चोरट्यांचा मोर्चा पर्यटकांकडे; दोन चोरीच्या घटनेत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

Share

पंचवटी । वार्ताहर

पंचवटीतील मखमलाबाद नाका येथील दुकानासमोर उभ्या असलेल्या कारमधून चोरट्यांनी दिवसा सुमारे दोन लाख रुपये असलेली बॅग पळवून नेली तर दुसर्‍या घटनेत भाविकांच्या गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरुन नेला.

साहेबराव पंडित दळवी (रा अमृतधाम, पंचवटी) हे पेठरोडवरुन इंडिका व्हेस्टा कारमधून (एमएच 15 सीडी 9378) जात असतांना ते ललवाणी कृषी केंद्रासमोर गाडी लावून वस्तू खरेदी करण्यासाठी गेले. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्याने गाडीचा दरवाजा उघडून त्यांच्या गाडीतील 1 लाख 91 हजार रूपयांची बॅग चोरुन नेली.

दुसर्‍या घटनेत हरियानातील गुडगांव येथून हेमंत कृष्णकुमार ठाकूर हे परिवारासह चारचाकी वाहनाने (एम. एच. 06 बी एफ 8565) नाशिकला देवदर्शनासाठी आले होते.

सकाळी 10 वाजेच्या दरम्यान रामकुंडावर कार पार्किंग करुन ते देवदर्शनासाठी गेले. थोड्यावेळाने परत आले असता त्यांच्या गाडीची काच फोडून 30 हजार रुपये किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरुन नेल्याचे लक्षात आले.

वाहन पार्किंग रामभरोसे

पंचवटीतील रामकुंड येथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. याठिकाणी वाहन पार्किंगसाठी महापालिकेतर्फे चारचाकी वाहनाचे 40 रुपये आकारतात.

मात्र, त्या तुलनेत वाहनांच्या सुरक्षेसाठी कुठलीही कुठलीही उपाययोजना केलेली नाही. असे असतांना ज्या भाविकांच्या गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरीला गेले त्यानाच पार्किंगची पावती फाडणार्‍या मनपा कर्मचार्‍यांने आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा केविलवाणा प्रकार केला. मात्र या नंतर त्या भाविकांनी गाडी की पार्किंगके पैसे लेते हो, तो आपकी कुछ जीमेदारी है की नही’ अशा शब्दात सुनावले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!