Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : येवला : लाखो रुपयांच्या पैठणी चोरल्या; चोरट्यांचा ‘नागीण डान्स’ व्हायरल

Share

येवला | राजेंद्र शेलार

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरु आहे. चांदवड तालुक्यातील चोरीच्या घटना ताज्या असतानाच मध्यरात्री पैठणीचे माहेरघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या येवला शहरात चोरट्यांनी तब्बल तीन लाखांच्या पैठणी साड्या चोरून नेल्या. चोरटे एवढ्द्यावरच थांबले नाहीत, चोरी केल्यानंतर त्यांनी साड्यांच्या दालनात डान्सदेखील केला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र पसरल्यानंतर कुणी या डान्सला नागीण डान्स म्हटले तर कुणी खानदेशी नृत्य म्हटले.

यामुळे जिल्हाभरात येवल्याच्या पैठणी चोरीची चर्चा मात्र पंचक्रोशीत रंगली आहे. येवला शहरातील प्रसिध्द नाकोडा पैठणी या दुकानात ही घटना घडली.

या घटनेत तीन लाख रुपयांच्या पैठणी साड्या चोरट्यांनी चोरून नेल्या. या धाडसी चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

येवला शहर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!