Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : वावीत मध्यरात्री दुकान फोडले; किरणा माल घेऊन चोरट्यांचा पोबारा

Share

सिन्नर | वार्ताहर

तालुक्यातील वावी येथे बसस्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर असलेले किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले.  किराणा दुकानातून 50 हजार रुपये किमतीचे किराणा सामानासह दुकानदारास जवळपास 1 लाख रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यावेळी चोरट्यांनी साखर, शेंगदाणे पोते, साबण व गोडेतेलाचे बॉक्स, बिस्किटांचे बॉक्स चोरट्यानी लांबवले. या चोरीसाठी चार चाकी वाहनाचा वापर झाल्याचा अंदाज  व्यक्त केला जात आहे.

अधिक माहिती अशी की, योगेश पाचपाटील यांचे भोलेहर किराणा अँड जनरल स्टोअर्स या नावाने किराणा दुकान आहे. आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास काही ग्रामस्थांना दुकानाचे शटर तोडलेल्या अवस्थेत दिसले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अज्ञात चोरट्यानी लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुकानाचे पूर्वेकडील बाजूचे शटर उचकवून आता प्रवेश केला. आतील सामानाची उचक पाचक करून गल्ल्यात असलेली चिल्लर सह दहा हजारांची रक्कम लांबवली.

दुकानात विक्रीसाठी ठेवलेले 25 हजार रुपयांचे मोबाईल फोन देखील चोरून नेले. याच दुकानाच्यासमोर असणाऱ्या प्रकाश कासार यांच्या संजीवनी इलेक्टरीकल या दुकानाचे शटर तोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केला.

या बाबत पोलीस ठाण्यात कळवल्यावर हवालदार संदीप शिंदे, सुधाकर चव्हाणके, नितीन जगताप, भास्कर जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला.

ग्रामीण पोलिसांकडून नियमित गस्त घातली जावी

वावी गावात पोलिसांकडून रात्रीच्या वेळी नियमित गस्त घातली जात नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. गावात अशा प्रकारच्या लहानमोठ्या नेहमीच घडत असून रात्री उशिरापर्यंत मद्यपान करून फिरणाऱ्या व ग्रामस्थांना शिवीगाळ करणाऱ्या टवाळांचा देखील बंदोबस्त करावा, गावातून रात्री पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलीस कर्मचारी गावातून रात्री तसेच दिवसा देखील गस्त घालण्यास टाळाटाळ करतात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!