मोबाईलवर बोलताना सावधान; दुचाकीवरील चोरटे पळवत आहेत मोबाईल

0

नाशिक ।  रस्त्याने मोबाईलवर बोलत जाण्याची सवय तुम्हाला महागात पडू शकते. अशा प्रकारे बोलणाऱ्यांचे फोन चोरट्यांकडून सहज लंपास होण्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

शहरातील साईनाथनगर चौफुली भागात रस्त्याने पायी जाणार्‍या तरूणाच्या हातातील महागडा मोबाईल दुचाकीस्वार दोघांनी पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली.

या प्रकरणी मारूती भगीरथ खिस्ते (18 रा.अनूश्री रेसि. अशोकामार्ग) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

मारूती शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या मित्रासमवेत घराकडे परतत असतांना ही घटना घडली. साईनाथनगर चौफुलीकडून दोघे मित्र घराकडे पायी जात असतांना पाठीमागून प्लेझर (एमएच 15 डीके 5792) वरील चालकाने मोबाईलवर बोलत चालणार्‍या मारूती यांच्या डोक्यास चापट मारली, तर पाठीमागे बसलेल्या युवकाने त्याच्या हातातील मोबाईल बळजबरी हिसकावून घेत रवीशंकर मार्गाने पोबारा केला.

याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास उपनिरीक्षक डी.पी.पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*