Thursday, April 25, 2024
Homeनगररोड रॉबरी करणारे अटकेत

रोड रॉबरी करणारे अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाळत ठेवून रस्ता लूट करणार्‍या पाच जणांच्या टोळीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील लुटेर्‍यांनी रस्ता लुटीचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

अक्षय भीमा गाडे (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड), विश्वास नामदेव गायकवाड (रा.एमआयडीसी, नगर), निलेश बाळासाहेब कार्ले (रा. गजानन कॉलनी), निलेश संजय शिंदे (रा. तांबटकर मळा, सावेडी) आणि अमोल बाबुराव कणसे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

निंबळक-केडगाव बायपासवर दोघा ट्रकचालक आणि कार चालकाला तसेच पाईपलाईन रोडवर पादचार्‍यास कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याच्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची कबुली या टोळीने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या