Friday, April 26, 2024
Homeनगररस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराला देणार 65 लाख ?

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराला देणार 65 लाख ?

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका ठेकेदाराला 65 लाख रुपये देणार असल्याचे समजते. शहरातील सर्वच रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्ड्यामुळे अपघात झाले. काहींना जीव गमवावा लागला. वाहनांचे नुकसान झाले. नागरीकांनी नगरपालिके विरुध्द संताप व्यक्त केला. खा. सदाशिव लोखंडे यांनी पालिकेत जावून मुख्याधिकारी बी. सी गावीत यांना जाब विचारला. शिवाय खड्ड्यामुळे अपघातात कुणी दगावले तर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असे सांगितले.

पालिकेच्या सभेत सुद्धा या प्रश्नावरुन चांगलाच गदारोळ झाला. अखेर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले की, पूवीं ज्या ठेकेदाराने काम केले आहे, तोच ठेकेदार हे काम करणार आहे. त्यासाठी नविन पैसे देणार नाही, जो रस्ता जादा खराब आहे, त्याचे संपूर्ण काम करणार. हे करत असतांना अतिक़मण काढणार, असे त्यांनी सभाग़हात सागितले होते. काम सुरू झाले. खड्डे बुजविण्यासाठी जी खडी वापरण्यात आली ती निकृष्ठ होती. हे काही जानकारांनी नगराध्यक्षाना भेटून लक्षात आणून दिले. त्यावेळी समजलेली माहिती धक्कादायक होती। खड्डे बुजविण्यासाठी नविन ठेकेदार नेमला असून त्यासाठी पालिका 65 लाख रुपये देणार आहे. असे समजते की, तीन नगरसेवकांनी या कामाचे बिल काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तशी व्हिडोओ क्लीप व्हायरल झाली असल्याचे समजते.

- Advertisement -

खड्डे बुजविण्याच्या जुन्या कामाचे ठेकेदाराला पैसे देणार नाही
शहरातील संगमनेर नाका ते नेवासा नाक्यापर्यंत रस्त्याचे काम सन 2015 मध्ये झाले होते. त्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराला रुपयाही देणार नाही. परंतू अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करुन नवीन कामाचे त्याला जेवढे काम होईल, त्याप्रमाणे पैसे देण्यात येणार आहे. 65 लाखाचा विषय फक्त प्रस्ताव पाठविण्यापुरता मर्यादित आहे. मी याच शहरातील नागरिक असून, मी चुकीचे काम करणार नाही. विरोधी नगरसेवकांनी रस्त्याचे जे काम होत आहे, ते चांगल्या दर्जाचे कसे होईल, याकडे लक्ष द्यावे, निव्वळ विरोध करायचा म्हणून करु नये, नागरिकांनी देखील आपल्या भागातील काम दर्जेदार करुन घ्यावे.
-अनुराधाताई आदिक, नगराध्यक्षा

उद्या पालिकेची इमारत विकतील….
खड्डे बुजविण्यासाठी पैसे दिले जाणार नाही असे, नगराध्यक्षांनी सांगितले आहे. असे असतांना पालिका 65 लाख रुपये देणार आहे. ही बाब चिंताजनक आहे. असाच कारभार सुरु राहिला तर सत्ताधारी एक दिवस पैशासाठी नगरपालिका विकतील. हा मोठा धोका आहे.
-श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक.

- Advertisment -

ताज्या बातम्या