कामाटवाड्यात रस्त्याला भगदाड; ठेकेदाराने केली तत्काळ मलमपट्टी

0
नवीन नाशिक | कामठवाडा येथे रस्ता खचला  घटनेत नागरिकांच्या प्रसंगावधानाने कुणीही जखमी झाले नाही. खचलेल्या रस्त्यात जवळपास जवळपास ५ ते ६ फुटांचा खड्डा पडला होता.

विशेष म्हणजे हा रस्ता काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभागातील नगरसेवक शाम साबळे यांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून जाब विचारला. त्यानंतर त्या ठेकेदाराने हा खड्डा बुजवून वरच्या वर मलमपट्टी करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र हा खड्डा पडलाच कसा? काल नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबले होते. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी गेले त्यामुळे रस्ते खचले आहेत.

येथील रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप येथील स्थानीक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, नागरिकांचा रोष बघता ठेकेदाराने कर्मचार्यांना बोलावून याठिकाणी तत्काळ मलमपट्टी केली.

LEAVE A REPLY

*