Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

महाजनादेश यांत्रेसाठी शहरभर रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन

Share

नाशिक । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेनिमित्त बुधवारी (दि.18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरात बाईक रॅली आणि रोड शो चे आयोजन केले आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक बंद राहणार असून ती इतरत्र वळवण्यात आल्याचे शहर वाहतूक शाखेने सांगीतले आहे.

यासंदर्भात वाहतूक शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी अधिसुचना काढून वाहतूक मार्गात बदल केले आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजता बाईक रॅलीस सुरुवात होणार आहे. यावेळी शेकडो बाईक सहभागी होणार असल्याने वाहतूक खोळंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून वाहतूक शाखेने बाईक रॅली व रोड शो वरील मार्गावरून सामन्य वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुपारी एक ते रोड शो संपेपर्यंत हा बदल राहणार आहे. महाजनादेश यात्रा मार्गातील वाहतूक यात्रा पुढे गेल्यानंतर टप्याटप्याने सोडण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रा मार्गातील बाईक रॅली व रोड शो साठी येणारे वाहने ईदगाह मैदान येथे पार्किंग करावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

असे पर्यायी मार्ग

* पाथर्डीफाटा ते नवीन नाशिक हॉस्पीटल या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली असून नागरिकांनी अंबडगाव-गरवारे टी पॉईंट- या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

* सिडको हॉस्पीटल (जनता स्वीट) ते उत्तमनगर या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद असणार आहे. त्याकाळात नागरिकांनी माउली लॉन्स, आयटीआय ब्रिज, डिजीपी नगर रोड, खुटवडनगररोड इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

* उत्तमनगर ते दिव्या अ‍ॅडलब वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहणार आहे. नागरीकांनी विनयनगर रोड, कामटवाडे रोड व इतर पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.

* दिव्या अ‍ॅडलब ते उंटवाडी ब्रिज वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. नागरीकांनी विनयनगर रोड,कामटवाडे रोड व इतर पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.

* सीटी सेंटर मॉल सिग्नल ते मायको सर्कल वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. नागरीकांनी सातपूर रोड शरणपूर रोड सिग्नल पावेतो तेथून गंगापूररोड, गोविंद नगर, आयटीआय ब्रिज, इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा

* मायको सर्कल ते त्रंबकनाका सिग्नल वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. त्या काळात नागरीकांनी शरणपूर रोड, चांडक सर्कल, सारडा सर्कल, मुंबईनाका इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा

* त्रंबकनाका सिग्नल ते गंजमाळ सिग्नल ते शालीमार ते सारडा कन्या विद्यालय ते नामको बँक ते तिरंगा चौक मेनरोड वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. त्या काळात नागरीकांनी

*सारडा सर्कल, गडकरी चौक, बादशाही कॉर्नर, गाडगेमहाराज पुल, अशेाक स्तंभ, गंगापूर रेाड, मुंबईनाका इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा.

* गाडगे महाराज पुतळा मेनरोड ते धुमाळ पॉईट ते रविवार कारंजा -अहिल्याबाई होळकर पुल वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. त्या काळात नागरीकांनी गंजमाळ सिग्नल, सारडा सर्कल, शालीमार, सांगली बँक सिग्नल, वकिलवाडी, अशोकस्तंभ, गंगापूर, इतर मार्गाचा वापर करावा.

* अहिल्याबाई होळकर पुल ते पंचवटी कारंजा वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. नागरीकांनी अशोक स्तंभ,गंगापूर रोड, मखमलाबाद रोड, पेठरोड, इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

असा आहे रॅली मार्ग
रॅली पाथर्डी फाटा येथून सूर होऊन- अंबड लिंक रोड-उत्तमनगर चौक- पवन नगर- सावतानगर- दिव्या अ‍ॅडलॅब चौक- त्रिमुती चौक- सिटी सेंटर मॉल सिग्नल- संभाजी चौक- दक्षिण मुखी हनुमान मंदिर चौक- मायको सर्कल- तरणतलाव सिग्नल- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापर्यंत होणार आहे.

त्याचप्रमाणे सायंकाळी चार नंतर त्रंबक नाका सिग्नल- जी.पी.ओ.रोड. शाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक- गंजमाळ सिग्नल- शिवसेना भवन- शालीमार- सारडा कन्या मंदिर विदयामंदिर- नेहरू उद्यान- शिवाजी रोड- संत गाडगे महाराज पुतळा चौक- मेन रोड- धुमाळ पॉईन्ट – रविवार कारंजा- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुल- मालेगाव स्टॅड- पंचवटी कारंजा या मार्गावरून महाजनादेश यात्रेचा रोड शो राहणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!