Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

राज्यांतर्गत नदीजोड प्रकल्पांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यातील नदीजोड प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी दूर करुन या प्रकल्पांना चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या नदी जोड प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री.फडणवीस बोलत होते.

राज्य शासनामार्फत दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.

या प्रकल्पासाठी दीर्घकालीन मुदतीकरिता कमीत कमी व्याजदराने निधी उभारुन प्रकल्प राबविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या व्यतिरिक्त विपूल पाणी उपलब्धतेसाठी अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच या योजनांतील धरणांमुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींसाठी पाणी राखीव ठेवण्यात यावे अशाही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, प्रकल्प सचिव सं.कृ घाणेकर, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!