‘या’ मराठी सिनेमात झळकणार ‘आर्ची’!

0

सैराटला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर आर्चीचा म्हणजेच रिंकू राजगुरूचा आगामी सिनेमा कोणता असेल याची रसिकांना उत्सुकता आहे. आर्चीसह झळकलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर मात्र महेश मांजरेकर यांच्या ‘एफयू’ सिनेमात झळकला.मात्र रिंकु सैराटनंतर कोणत्याच सिनेमात झळकली नाही.

आता रिंकु लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहे. सध्या सिनेमाचे वाचन सुरू आहे. या सिनेमाची इतर माहिती गुलदस्त्यातच ठेवण्यात आली असून लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजतंय.

रिंकुच्या आगमी मराठी सिनेमात तिच्यासह कोण झळकणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

LEAVE A REPLY

*