Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारसात महिन्यांत चार लाचखोरांना सश्रम कारावास

सात महिन्यांत चार लाचखोरांना सश्रम कारावास

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

जिल्हयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) गेल्या सात महिन्यात लाच स्विकारतांना अटक केलेल्या चार लाचखोरांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोणताही सरकारी नोकर, निमशासकीय नोकर किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी एजंट जो सरकारी काम करुन देण्याच्या मोबदल्यात कोणाही नागरीकांकडून लाच अथवा बक्षिसाची मागणी करतो.

- Advertisement -

अशा सरकारी नोकराची किंवा त्यांच्यावतीने काम करून देतो सांगणार्‍या खाजगी इसमाची अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केल्यास संबंधीतांवर भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयातील तरतुदीन्वये गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर संबधित आरोपी लोकसेवक अथवा खाजगी इसमांविरुध्द् न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन खटला चालविला जातो. संबधित आरोपीतांविरुध्द न्यायालयात खटला चालू असतांना सरकारी वकिलांमार्फत युक्तीवाद होवून आरोपीतांविरुद् दोषसिध्दी होण्यासाठी प्रयत्न केला जातो. पैरवी अधिकारी/अंमलदार यांच्यामार्फत देखील नमुद गुन्हयांत दोषसिध्दी होण्यासाठी पाठपुरावा केला जातो.

या प्रयत्नांचा भाग म्हणून अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो (Anti-Corruption Bureau), नंदुरबार युनिटकडील खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील स्वर्णसिंग गिरासे यांनी कौशल्यपूर्वक व अतिशय मेहनतीने दोषसिध्दी होण्याचे दृष्टीने सरकारी पक्षाची बाजू मांडून अति. सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय शहादा येथील जिल्हा न्या.सी.एस.दातीर यांच्या न्यायालयाने साक्षी व पुराव्यांचे आधारे नोव्हेंबर-2022 या महिन्यात 1 तसेच जानेवारी 2023 या महिन्यात 01 व जून- 2023 या महिन्यात 01 अशा एकूण 03 खटल्यांत लाचेच्या गुन्हयात दोषारोप सिध्द केले आहेत. तसेच एकूण 04 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या