प्रत्येक नागरिकाला सन्मानानं मरण्याचा अधिकार- सरन्यायाधीश

0
पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी इच्छामरणाच्या मुद्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. कायद्याच्या तर्कानं पाहता, कोणतीही व्यक्ती आत्महत्या करू शकत नाही. मात्र प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं मरण्याचा अधिकार आहे, असं दीपक मिश्रा पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानमालेला संबोधित करताना म्हणाले. ‘बॅलेन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राईट्स’ विषयावर आधारित व्याख्यानमालेला सरन्यायाधीश उपस्थित होते.

‘एखादा व्यक्तीला कधीही बरा न होणारा दुर्धर आजार झाला असेल आणि त्याला इच्छा मरण हवं असेल तर तो ‘इच्छामरणाचे मृत्यूपत्र’ बनवू शकतो’, असं दीपक मिश्रा म्हणाले. ‘अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाने ९ मार्च रोजी इच्छामरणाबाबत निकाल दिला होता. हा निकाल देताना इच्छामरणाच्या मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शकतत्त्वही घालून दिले होते. कोर्टाने लोकांना सन्मानाने मरण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं. त्याचा मिश्रा यांनी पुनरुच्चार केला.

LEAVE A REPLY

*