महसूल अधिकार्‍यांच्या बदल्या

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- बराच काळापासून प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील महसूल अधिकार्‍यांच्या राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. यात नगर-नेवासा प्रांताधिकारी वामन कदम यांची जिल्ह्यातच बदली झाली असून कर्जतचे प्रांताधिकारी रविंद ठाकरे यांची बदली झाली असली त्यांना नेमणुकीचे ठिकाण अद्याप दिलेले नाही. जिल्ह्यात नव्याने चार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी रुजू होणार आहे.
नगर-नेवासाचे प्रातांधिकारी यांची नगरला उपजिल्हाधिकारी रोजगार हमी विभागात बदली झाली आहे. कर्जतचे प्रातांधिकारी यांची बदली झाली असून ते सध्या हाँगिंग आहे. जिल्ह्यात चार नवीन परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी रुजू होणार आहेत. त्यात नगर प्रांताधिकारी म्हणून परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर, पाथर्डी प्रांताधिकारी म्हणून परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विक्रम बांदल, कर्जत प्रांताधिकारी म्हणून परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, आणि उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र-14 या पदावर परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाथर्डीचे उपविभागीय् अधिकारी प्रशांत खेडेकर यांची उपविभागीय अधिकारी कळमनुरी, जिल्हा हिंगोली या पदी बदली करण्यात आली आहे. यासह शेख मोहम्मद यांची नगरला तहसीलदार कुळकायदा पदावर, नाशिकचे साहय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील यांची नगरला साहय्यक पुरवठा अधिकारी पदावर, नगरचे कुळकायदा विभागाचे तहसीलदार आर.बी. थोटे यांची साहय्यक पुरवठा अधिकारी नाशिक येथे, तर जितेंद्र इंगळे यांची साहय्यक पुरवठा अधिकारी म्हणून नगर, उमेश पाटील तहसीलदार नेवासा तर नगरचे साहय्यक पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांची जळगावाला सामान्य प्रशासन विभागात तहसीलदार पदावर बदली झाली आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने काल (दि. 22) याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

 

LEAVE A REPLY

*